आयपीएलच्या 18 व्या मोसमाची (IPL 2025) सर्व क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 18 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर रविवारी 23 मार्चला डबल हेडर अर्थात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान अशी लढत होणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष हे दुसऱ्या डबल हेडरमधील दुसर्या सामन्याकडे असणार आहे. या दुसर्या सामन्यात स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. तसेच मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याचीही खेळण्याची शक्यता कमी आहे. अशात चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी पलटणची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? याबाबत जाणून घेऊयात.
कॅप्टन हार्दिकवर एका सामन्याची बंदी असल्याने त्याला खेळता येणार नाही. तसेच बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या 18 व्या हंगामातील काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. अशात मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी कुणाला मिळणार? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
माजी कर्णधार रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन हे दोघे ओपनिंग करतील. मधल्या फळीतील जबाबदारी तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांवर असणार आहे. हार्दिक नसल्यामुळे त्याच्या जागी विल जॅक्स याला संधी मिळू शकते. विल जॅक्स याच्यात सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे जॅक्सनला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
नमन धीर सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो.त्यामुळे नमनवर फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी असेल. तसेच मुजीब उर रहमान आणि कर्ण शर्मा या जोडीवर फिरकी बॉलिंगची जबाबदारी असेल. दीपक चाहर आणि ट्रेन्ट बोल्ट या दोघांवर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंग ऑलराउंडर कॉर्बिन बॉश याला संधी दिली जाऊ शकते.
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात मुंबईचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न आहे. मुंबईच्या गोटात कर्णधारपदासाठी अनेक दावेदार आहेत. यामध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांची नावं आघाडीवर आहे. या दोघांपैकी कुणालाही चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, विल जॅक्स/रॉबिन मिंज, नमन धीर, कॉर्बिन बॉश/ मिचेल सँटनर, दीपक चाहर, मुजीब उर रहमान, कर्ण शर्मा आणि ट्रेंट बोल्ट.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, कॉर्बिन बॉश आणि अश्वनी कुमार.