आपल्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर नोरा फतेही हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दिलबर गर्ल म्हणून चाहते तिला ओळखतात. नृत्यातून तिने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
नोराने अनेक सिनेमामध्ये आयटम साँग केले आहेत. तिचे सगळे साँग सुपरहिट ठरले आहेत.
दरम्यान नोराने नुकताच एका डिझायनर साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवर नोराने फोटो शेअर केले आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोला पसंती दाखवली आहे.
डिझायनर साडी, मोकळे केस आणि डायमंडचे कानातले यामुळे तिचं रुप अधिकच खुलून दिसत आहे.
नोराच्या वेगवेगळ्या पोज चाहत्यांना पार भावल्या आहेत. नेटकरी तिच्या फोटोवर कमेंट्स करत तिचं कौतूक करत आहेत.