होळीच्या दिवशी हत्या, गोणीत मृतदेह टाकला, डायरीवरच्या नंबवरुन सुगावा लागला; रत्नागिरीतील हत्येचा उलगडा
Saam TV March 19, 2025 02:45 AM

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे झालेल्या हत्येचा उलगडा रायगड पोलिसांनी अवघ्या १२ तासात करत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. म्हसळा तालुक्यातील तोराडी बंडवाडी येथे गोणीमध्ये कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या खिशातील डायरीवर लेबर सप्लायर संतोष साबळे याचा एकमेव फोन नंबर सापडला. या नंबरच्या अधारे तपासाची सुत्र हलवत म्हसळा पोलिसांनी संतोष साबळे, विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य या तिघांना अटक केली. होळीच्या दिवशी झालेल्या वादात बादशहा नावाच्या व्यक्तीची हत्या झाल्याचं चौकशीत समोर आलं आहे.

चोरट्यांचा पाठलाग करणे पतीच्या जीवावर बेतलं

दरम्यान, जिल्ह्यात देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यात पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्यासाठी जीवघेणा ठरलं आहे. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्याने बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पत्नीच्या आयुष्याचे मंगळसूत्रच हिरावून घेतलं आहे.

अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात सदरची घटना घडली. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म चारवर रेल्वेतून गावंडे दाम्पत्य खाली उतरले. याचवेळी एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मंगळसूत्र तोडून पडणाऱ्या चोरट्याचा महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी पाठलाग केला. जवळपास आठशे ते नऊशे मीटर पर्यंत पाठलाग सुरुचं होता. अखेर त्यांच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला. पण त्याने त्यांना बेदम मारहाण करत त्यांची केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.