Sunita Williams Return Update : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर जवळपास 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतले आले आहेत. 19 मार्चला पहाटे चार वाजताच्या सुमारास ते पृथ्वीवर पोहोचले. त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले आणि पॅरॅशूटने लँड झाले.
त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. या अंतराळवीरांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या. त्यामुळे ते 9 महिने अवकाशात अडकून तरहिले होते. त्यावर मात करत ते सुखरूप परत आले आहेत.
पृथ्वीवर परतीनंतर लगेचच सुनीता विल्यम्स यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना यांनातून बाहेर आणत असताना म्हणाल्या,थँक यू. त्यांनी या शब्दातून नासा आणि संपूर्ण जगाचे आभार मानले आहेत.पृथ्वीवर सुखरूप परत आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या अंतराळवीरांच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल.
सुनीता विल्यम्स परत आल्यामुळे जगभर आनंद साजरा केला जात आहे. काल पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देखील पत्राद्वारे त्यांना सुखरूप परतीबद्दल लिहिले होते.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 5 जून 2024 ला बोईंगच्या स्टारलायनर यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना झाले होते. त्यांची मोहीम फक्त 8 दिवसांची होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांची पृथ्वीवर परती तब्बल 9 महिन्याने झाली. आता त्यांच्या सुखरूप परतीने जगभर आनंद साजरा होतोय.