राजस्थान रॉयल्सचा विस्फोटक फलंदाज रियान पराग आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. रियानने राजस्थान रॉयल्सच्या इन्ट्रा स्क्वाड मॅचमध्ये झंझावाती शतकी खेळी केली आहे. रियानने अवघ्या 64 चेंडूत नाबाद 144 धावांची खेळी केली आहे. विशेष म्हणजे रियानने या खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. रियानने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 26 चेंडूत 104 धावा केल्या. रियानने या खेळीत 10 षटकार आणि 16 चौकार लगावले.
रियानने आयपीएलच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) धमाकेदार कामगिरी केली होती. रियानला याच कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात संधी देण्यात आली होती. रियानने 17 व्या हंगामातील 16 सामन्यांमध्ये 52 पेक्षा अधिक सरासरीने आणि जवळपास 150 च्या स्ट्राईक रेटने 573 केल्या होत्या. रियानने या दरम्यान 4 अर्धशतकं झळकावली होती. तसेच रियानने 4 विकेट्सही घेतल्या होत्या.
रियानने त्याच्या खेळत मोठा बदल केला. रियानने फटकेबाजीसह एकेरी-दुहेरी धावाही घेतो. रियानने बॅटिंगमध्ये आवश्यक ते बदल केले. त्याचाच फायदा रियानला झाला. रियान काही महिन्यांपूर्वी दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर व्हावं लागलं होतं. मात्र आता रियान आयपीएलसाठी सज्ज झाला आहे.
रियानच्या या धमाकेदार कामगिरीमुळे राजस्थानने त्याला आपल्यासह कायम ठेवलं आहे. राजस्थानने रियानसाठी 14 कोटी मोजून आपल्यासोबत कायम ठेवलं. राजस्थानने रियान व्यतिरिक्त संजू समॅसन, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा या खेळाडूंनाही रिटेन केलं आहे.
रियान परागची स्फोटक खेळी, 18 व्या मोसमासाठी सज्ज
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कर्णधार), ध्रुव जुरेल, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, वानिंदु हसारंगा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय सिंह, नीतीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, फझलहक फारूकी, युद्धवीर सिंह चरक, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, अशोक शर्मा आणि कुणाल राठोड.