IPL 2025 : रवींद्र जडेजा मोठा विक्रम करण्यासाठी सज्ज, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑलराउंडर ठरणार
GH News March 20, 2025 02:07 AM

चेन्नईचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) जोरदार तयारी करत आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्यात गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना 22 मार्चला कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर चेन्नई आणि मुंबई हे दोन्ही यशस्वी संघ एकमेकांविरुद्ध 23 मार्चला आपल्या मोहिमेतील पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्यात ऑलराउंडर रवींद्र जडेजाकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जडेजाला कोणता विक्रम करण्याची संधी आहे? हे जाणून घेऊयात.

पुणेकर ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. जडेजाचा खेळाडू म्हणून यंदाचा आयपीएलचा 12 वा हंगाम असणार आहे. जडेजाकडे आयपीएल स्पर्धेत 3 हजार धावा आणि 150 विकेट्स घेणारा पहिलावहिला ऑलराउंडर होण्याची संधी आहे. जडेजाला हा विक्रम करण्यासाठी फक्त काही धावांचीच गरज आहे. जडेजाने याआधीच 150 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांचं जडेजाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

रवींद्र जडेजाची आयपीएल कारकीर्द

जडेजाने 2008 साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. जडेजाने तेव्हापासून ते 17 व्या मोसमापर्यंत 240 सामने खेळले आहेत. जडेजाने 240 सामन्यांमधील 184 डावांमध्ये 2 हजार 959 धावा केल्या आहेत. त्यामुळे जडेजा 3 हजारांपासून फक्त 41 धावा दूर आहे. जडेजाने आयपीएलमध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच जडेजाने 215 चौकार आणि 107 षटकार लगावले आहेत.

बॉलिंग रेकॉर्ड

जडेजाने 240 सामन्यांमधील 211 डावात 7.62 च्या इकॉनॉमीने 160 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाची 16 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

‘सर’ रवींद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, मथीशा पथिराणा, शिवम दुबे, आर अश्विन, डेवन कॉन्वहे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुड्डा, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी आणि श्रेयस गोपाळ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.