युजवेंद्र चहल – धनश्री वर्माच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब; इतकी मिळाली पोटगी
GH News March 20, 2025 05:13 PM

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. आज (20 मार्च) वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली. यावेळी युजवेंद्र आणि धनश्री दोघं कोर्टात उपस्थित होते. धनश्री आणि युजवेंद्र हे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आयपीएलमुळे चहल 21 मार्चपासून उपलब्ध नसण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने आजच त्यावर निर्णय घेतला.

धनश्री आणि युजवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली. युजवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये आधीच दिले आहेत. आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येईल.

बातमी अपडेट होत आहे..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.