Maharashtra Live Updates खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sarkarnama March 20, 2025 06:45 PM
Satish Bhosale: शिरुर सत्र न्यायालयात सुनावणी

ढाकणे पिता-पुत्राला मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिरुर सत्र न्यायालयात याची सुनावणी आहे.

Satish Bhosale: पहिली सुनावणी, राज्याचे लक्ष

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या याची सात दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. शिरूर न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे. शिरूर पोलीस ठाण्यासह चकलांबा पोलीस ठाण्यात त्याच्यावर खोक्या विरोधात गुन्हा दाखल आहे. न्यायालय आज काय निर्णय देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

IPS Rashmi Karandikar : आयपीएस रश्मी करंदीकर यांच्या अडचणीत वाढ?

आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून दुसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावला आहे. रश्मी करंदीकर यांच्या पतीवर आर्थिक घोटाळ्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. पती-पत्नीमधील आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी केली जाणार आहे. त्याबाबतच त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत.

Nagpur Violence News : नागपूर हिंसाचारप्रकरणी मोठी अपडेट्स, दंगलीत बांग्लादेश कनेक्शन

नागपूर हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात दोन समाजांना भडकावणारे भाषण केल्याचा गुन्हा नोंद आहे. यानंतर आता नागपूर हिंसाचारप्रकरणी मोठी अपडेट्स समोर आली असून पोलिसांनी दंगली मागे बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी काही पोस्ट बांग्लादेशातून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Prashant Koratkar News : प्रशांत कोरटकर अद्यापही फरारच..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला कधी अटक होऊ शकते. मात्र तो अद्यापही फरार असून कोल्हापूर पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी नागपुरात तळ ठोकून आहेत.

MVA News : राज्यपालांची भेट घेणार महाविकास आघाडीचे नेते

विधानपरिषदेत नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेत्यांनी केला आहे. या आरोपावरून आज (ता.20) सकाळी 11.30 वाजता मविआचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. तसेच नागपूर घटनेप्रकरणीही महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Santosh deshmukh case News : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण, आंधळेचा शोध लागेना

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 100 दिवस पूर्ण झाले. मात्र अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेत असून बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केल आहे. आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीसही घोषित करण्यात आलं आहे.

Disha Salian death Case : दिशा सालियनच्या मुंबईतील घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा दावा करताना तिच्या वडिलांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा, अशा याचिका न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर आता दिशा सालियनच्या मुंबईतील घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

NCP Politics News : अजित पवार पक्षाच्या नेत्याची नाशिकमध्ये चॉपरने हत्या

नाशिक शहरात गेले काही दिवस गुन्हेगारीचा हा लेख सतत चढता आहे शहरात अनेक ठिकाणी कोयता यांचा उपद्रव वाढत आहे. आतातर शहरातील बजरंग वाडी परिसरात सशस्त्र टोलक्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावावर हल्ला केला. चॉपर आणि धारदार शस्त्राने झालेल्या या हल्ल्यात या दोघांचा मृत्यू झाला आहे

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य व 12 सरपंचांना झटका, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र

धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य व 12 सरपंच अपात्र ठरले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरन पूजार यांच्या आदेशानुसार हे आदेश काढले आहेत. तर ही कारवाई जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेली आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असून 9 जुलै 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश होते.

Disha Salian death Case : "दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न?"; नितेश राणेंचा आरोप

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांत आदित्य ठाकरेंचं नाव घेण्यात आल्याने भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियन प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.