अंतराळात ओव्हरटाईम म्हणून सुनीता विल्यम्सला किती रक्कम मिळत होती? तिचा पगार किती?
GH News March 20, 2025 07:13 PM

Sunita Williams Return: नासाची अंतराळवीर आणि भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी (287 दिवस) पृथ्वीवर परतली. त्या सुरक्षित पृथ्वीवर परत येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अंतराळात सर्वाधिक काळ राहणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आठवडाभरासाठी सुनीता विल्यम्स अंतराळात गेली होती. परंतु तिला नऊ महिने थांबावे लागले. त्यामुळे त्यांना अतिरिक्त वेतन आणि ओव्हरटाईम किती मिळला असणार? त्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

नासाचे माजी अंतराळवीर कॅडी कोलमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नासा अंतरळवारींना कोणताही ओव्हरटाईम देत नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त वेतनही देत नाही. त्यांना एक ठराविक रक्कम दैनंदिन भत्ता म्हणून मिळते. कॅडी कोलमॅन यांना 2010-11 मध्ये 159 दिवस अंतराळ मिशनसाठी $636 ( ₹52,800) अतिरिक्त भत्ता मिळाला होता. तो $4 (जवळपास ₹347) प्रतिदिन या दराने दिला गेला होता. हाच नियम सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विलोमर याच्यासंदर्भात लावला आहे. त्यांना 287 दिवसांच्या मिशनसाठी $1,148 ( ₹95,400) अतिरिक्त भत्ता मिळणार आहे.

सुनीता विल्यम्स यांचा पगार किती?

नासाच्या वेतन नियमावालीनुसार, सुनीता विल्यम्स आणि बुच विलोमर हे GS-15 रँकचे कर्मचारी आहे. ते अमेरिकन सरकारच्या जनरल पे स्केलपेक्षा जास्त आहे. त्यांची वार्षिक सॅलरी $125,133 ते $162,672 ( ₹1.08 कोटी ते ₹1.41 कोटी) दरम्यान आहे. 287 दिवसांच्या मिशनसाठी त्यांचा अंदाजे पगार $93,850 ते $122,004 ( ₹81 लाख ते ₹1.05 कोटी) असेल. अंतराळवीरांना प्रशिक्षणापासून मिशनपर्यंत अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. 9 महिने मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहणे, अंतराळ स्थानकावर संशोधन करणे आणि अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जाणे सोपे नाही.

सुनीता विल्यम्सने 15 मोहिमेअंतर्गत 9 डिसेंबर 2006 रोजी पहिल्यांदा अंतराळात पाऊल ठेवले. या मोहिमेत त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सहा महिन्यांहून अधिक काळ घालवला आणि अनेक महत्त्वाच्या प्रयोगांमध्ये भाग घेतला. या काळात त्यांनी चार स्पेसवॉक केले, ज्याचा एकूण कालावधी 29 तास 17 मिनिटे होता. दुसरे मिशन 14 जुलै 2012 ते 18 नोव्हेंबर 2012 पर्यंत होते. त्यावेळी त्या अंतराळात 127 दिवस होत्या. त्यामुळे आता अंतराळात सर्वाधिक वेळ राहणाऱ्या त्या दुसऱ्या महिल्या ठरल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.