दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घरी नोटांचे ढीग आढळले आहेत. त्यांची बदली आता अलाहाबाद येथे करण्यात आल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis : CM फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर जाणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये केल्या जाणाऱ्या नियोजित कामांचा आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.
Jayakumar Gore Satara Police : जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटकराज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेला 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने तब्बल 3 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
Aurangzeb Tomb : संभाजीनगरमध्ये NIA ची टीम दाखलऔरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर आता सर्व परिस्थीतीवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याठिकाणी देखील एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
University of Pune : पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २५ मार्चपासूनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित, अनुशेष लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा रीक्षा २५ मार्चपासून सुरू होणार आहेत. सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके विद्यापीठाच्या ‘www.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. विधी अभ्यासक्रम पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या एलएलबी, बीए एलएलबी परीक्षांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.
Pune News : पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्कामाजी नगरसेविका कल्पना थोरवे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कल्पना थोरवे यांचे पती संभाजी थोरवे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरूवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
Demand to ban Chhawa Film : छावा सिनेमामुळे नागपुरातील हिंसाचार?नागपूर येथील दोन समाजातील तणावाला कारण झाल्याचा आरोप करत छावा या बहुचर्चिच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मौलानांनी केली आहे. नागपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या चिथावणीखोर पोस्टमध्ये छावा विरोधात केलेला प्रचार तणावाला कारण झाल्याचा आरोप करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे बंदीची मागणी केल्याचंही मौलानांनी सांगितलं आहे. तर या सिनेमात सत्याशी फारकत घेतल्याचा आरोप देखील या पत्रातून करण्यात आला आहे.