Stock Market Closing: कोणत्या 3 कारणांमुळे शेअर बाजारात तेजी? सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला, निफ्टी 23,190वर बंद
esakal March 21, 2025 04:45 PM

Stock Market Closing Today: शेअर बाजारात गुरुवारी (20 मार्च) सलग चौथ्या व्यापार सत्रात वाढ झाली. बाजारातील ही वाढ यूएस फेडच्या धोरणात्मक निर्णयापेक्षा देशांतर्गत घटकांमुळे झाली आहे. यासह, मार्चमध्ये आतापर्यंत निफ्टी 50 3% पेक्षा जास्त वाढला आहे. सलग पाच महिन्यांच्या घसरणीनंतर हा बाउन्स बॅक आहे.

बीएसईचा 30 शेअर्सचा आज वाढीसह 75,917 वर उघडला. व्यापारादरम्यान तो 1000 हून अधिक अंकांनी 76,456 वर गेला. शेवटी, सेन्सेक्स 899.01 अंक किंवा 1.19% च्या वाढीसह 76,348 वर बंद झाला.

Stock Market Closing

त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 50 देखील 23,036 अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो 23,216.70 अंकांच्या उच्चांकावर गेला होता. तो अखेर 283.05 अंकांच्या किंवा 1.24%च्या वाढीसह 23,190.65 वर बंद झाला.

शेअर बाजार वाढण्याची कारणे काय? 1. फेडरल रिझर्व्हची भूमिका

यूएस फेडरल रिझर्व्हने वर्षाच्या अखेरीस व्याजदरात कपात करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, दरवाढीचा महागाईवर होणारा परिणाम फार काळ टिकणार नाही आणि मंदीची शक्यताही फारशी नाही. त्यामुळे बाजारातील अस्वस्थता काही प्रमाणात कमी झाली आहे.

Stock Market Closing 2. देशांतर्गत मागणी

कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि मुथूट फायनान्ससह अनेक शेअर्सनी अलीकडेच 52-आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला आहे, ज्यामुळे या विभागांमध्ये गुंतवणूकदारांची वाढती मागणी दिसून येते.

BSE SENSEX 3. यूएस बाजारातून सकारात्मक संकेत

बुधवारी अमेरिकन वाढीसह बंद झाले. फेडरल रिझर्व्हच्या विधानांमुळे तेथील गुंतवणूकदारांची भीती कमी झाली आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 383.32 पॉइंट्स किंवा 0.92 टक्क्यांनी वाढून 41,964.63 वर पोहोचला.

S&P 500 निर्देशांक 60.63 अंक किंवा 1.08 टक्क्यांनी वाढून 5,675.29 वर पोहोचला. Nasdaq Composite निर्देशांक देखील 246.67 अंकांनी किंवा 1.41% वाढून 17,750.79 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी 3.48 लाख कोटी कमावले

BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 20 मार्च रोजी 408.48 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार, 19 मार्च रोजी 405 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.48 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.48 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.