पुणे : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. विद्येचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या पुणे आता गुन्हेगारीचं हब बनलंय. शहरात बऱ्याच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. बलात्कार, मर्डर अशा घटना तर रोज घटताना दिसत आहे. त्याचदरम्यान, पुण्यातील खराडी चंदननगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पती-पत्नीच्या भांडणामधून राक्षसी वृत्तीच्या वडिलाने आपल्या पोटच्या सख्ख्या मुलाची हत्या केलीय.
धक्कादायक बाब म्हणजे या आरोपी बापाने मुलगा हरवला असल्याचा बनाव केला. चंदननगर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी आरोपी वडिलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने केलेल्या कृत्याची पोलिसांना त्याने माहिती दिली. (वय साडे तीन वर्षे) असं मुलाचं नाव असून या घटनेनं सर्वत्र परिसरात खळबळ उडाली आहे.
थेट गडाच्या पायथ्याशी
दरम्यान, पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या तरूणीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी गुरुवारी तिचा मृतदेह घेरेवाडी परिसरातील झाडाझुडपातून बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तरूणी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पालकांनी दाखल केली होती. पोलिसांनी तरूणीचा शोधमोहीम सुरू केली. मात्र, तरूणीचा थेट मृतदेह गडाच्या पायथ्याशी आढळला. तरूणीचा मृत्यू झाला कसा? तिचा मृतदेह गडाच्या पायथ्याशी आलाच कसा? याचा शोध पोलीस घेत आहेत.