इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा फ्रँचायझी टी२० लीग स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघांच्या फ्रँचायझी असून त्यांचे मालक आहेत. आयपीएल २०२५ मध्ये खेळणाऱ्या १० संघांचे मालक कोण जाणून घेऊ.
कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता यांच्याकडे आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क कलानिधी मारन, सन टीव्ही नेटवर्क यांच्याकडे आहेत.
पंजाब किंग्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क प्रीती झिंटा, मोहित बर्मन, नेस वाडीया, करन पॉल यांच्याकडे आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क मनोज बदाले, लचलन मुर्दोच आणि इतर काही सदस्यांकडे आहेत.
गुजरात टायटन्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क टोरंट ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स यांच्याकडे आहेत.
दिल्ली क्रपिटल्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क सज्जन जिंदाल, पार्थ जिंदाल, जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुपकडे आहेत.
लखनौ सुपर जायंट्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क संजीव गोयंका, आरपीएसजी ग्रुपकडे आहेत.
मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क रिलायन्स इंडस्ट्रीकडे आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क युनायटेड स्पिरिट लिमिटेडकडे आहेत.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या फ्रँचायझीचे मालकी हक्क एन श्रीनिवासन, इंडिया सिमेंट्स लिमिटेडकडे आहेत.