Dhanashree Verma : घटस्फोटाच्या प्रश्नावर धनश्री वर्मा काय म्हणाली? उत्तर वाचून बसेल धक्का
Saam TV March 22, 2025 03:45 PM

नुकताच भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट झाला आहे. अनेक काळापासून यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होता. मात्र आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर धनश्री वर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच धनश्री वर्माच एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'देखा जी देखा मैने' असे गाण्याचे नाव आहे. गाण्यात तिचे दाखवण्यात आले आहे. ज्याला ती वैतागली आहे.

घटस्फोटानंतर धनश्री पहिल्यांदाच एका कार्यक्रमाला स्पॉट झाली तेव्हा पापाराझींनी तिच्या घटस्फोटावर प्रश्न केला. पापाराझींनी विचारले की, "धनश्रीजी काही बोलणार का?" यावर उत्तर देत धनश्रीने 'नाही' अशी मान डोलावली. त्यावर नंतर धनश्री म्हणाली, "आधी तुम्ही लगेच माझे गाणे ऐका." यावर पापाराझी म्हणाले, "हे गाणे तुमच्या खऱ्या आयुष्यातील परिस्थितीसोबत मॅच होत आहे." यावर उत्तर म्हणून धनश्रीने स्माईल दिली आणि थंब दाखवला.

धनश्री वर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलने 2020मध्ये लग्नगाठ बांधली होती.मीडिया रिपोर्टनुसार, युजवेंद्र चहलने धनश्री वर्मा 4.75 कोटी रुपयांची पोटगी दिली. घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान युजवेंद्र चहलचे नाव आर जे महावशसोबत जोडले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.