दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर फाफ डु प्लेसिसने रोहित-धोनीला सुनावलं, म्हणाला की…
GH News March 25, 2025 07:12 PM

आयपीएल 2025 स्पर्धेची चुणूक पहिल्या काही सामन्यात दिसून आली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हा त्यापैकी एक सामना आहे. खरं तर दिल्ली कॅपिटल्सचा खेळ पॉवर प्लेमध्येच जवळपास आटोपला असं वाटलं होतं. त्यामुळे आता दिल्लीचं कमबॅक होईलन असं वाटलं नव्हतं. कारण फक्त 7 धावांवर तीन गडी तंबूत होते. त्यात 65 धावा असताना 5 गडी तंबूत होते. त्यामुळे सामना हातून गेल्याच्या स्थितीत असताना दिल्ली कॅपिटल्सने आशुतोष शर्मा नावाचं इम्पॅक्ट अस्त्र काढलं. मग काय शेवटपर्यंत तग धरून राहिला आणि विजय मिळवून दिला. त्याने 31 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 66 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सला 19.3 षटकात 1 गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार फाफ डु प्लेसिसने याबाबत आनंद व्यक्त केला आणि अप्रत्यक्षरित्या धोनी आणि रोहितला सुनावलं.

फाफ डु प्लेसिस म्हणाला की, हा एक शानदार सामना होता. तसेच, अनेक क्रिकेटपटू आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमाबद्दल तक्रार करतात. या सामन्याचा निकाल हा नियम का अस्तित्वात आहे याचा पुरावा आहे. कारण जेव्हा तुम्हाला वाटतं की सामना पूर्णपणे संपला आहे, तेव्हा कोणीतरी येऊन असं खेळतं. ते सामन्याचे संपूर्ण चित्र बदलून टाकतात.का रोमांचक लढाईसह विजय देखील आणतात. हा नियम अशा उत्साहासाठी आहे. यापूर्वी, मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा, माजी सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांच्यासह अनेक खेळाडूंनी इम्पॅक्ट प्लेअर नियमाला विरोध केला होता. यामुळे अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी होत आहे असे त्यांचे मत होते.

‘आमच्या संघाने 5 विकेट गमावल्या, तेव्हाही मला स्वतःला वाटले होते की आपण जिंकणार नाही. तथापि, माझ्या अंतर्मनाने मला सांगितले की जो खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर आहे तोपर्यंत काहीही घडू शकतं.त्यानुसार, आशुतोष शर्मा आणि विप्रज निगम यांनी अतिशय सुरेख खेळ केला.’ असं फाफ डुप्लेसिस म्हणाला.

‘शेवटच्या षटकात मोहित शर्माने काढलेल्या एका धावेने मला दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 438 धावांचा पाठलाग करताना मखाया एन्टिनीने काढलेल्या एका धावेची आठवण करून दिली. मोहित शर्माच्या कारकिर्दीतील ही सर्वात महत्त्वाची धावसंख्या असेल.’, असंही फाफ डु प्लेसिसने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.