जयकुमार गोरेंचा आणखी एक कारनामा उघड, मेलेल्या व्यक्तीला ‘जिवंत’ करून हडपली जमीन!
Marathi March 25, 2025 07:25 PM

महिलेला स्वतःचे नागडे फोटो पाठवल्याने वादात आलेल्या ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. मेलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून कॉलेजच्या रस्त्याची जमीन जयकुमार गोरे यांनी हडपल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

जयकुमार गोरेंची प्रकरणं तेथील लोकांनी आपल्याला पाठवली आहेत. आपल्या कॉलेजला जायला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील एका मृत व्यक्तीला गोरे यांनी जिवंत केलं आणि जमीन स्वत:च्या नावाने करून घेतली. पिराजी भिसे असे त्या मृत व्यक्तीचे नाव होते, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी माध्यमांना पुरावेही दाखवले.

https://www.youtube.com/watch?v= pj7buficsqe

काय आहे प्रकरण?

जमिनीचा करारनामा 11 डिसेंबर 2020 रोजी केला आहे. 8 ऑक्टोबर 2016 रोजी पिराजी भिसेंचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र देखील आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. यात पिराजी भिसे यांच्या ऐवजी संजय काटकर यांचा फोटो लावला आणि ते भिसे आहेत, असे दाखवण्यात आले. भिसे अशिक्षित होते. मात्र, त्यांची सही इंग्रजीमध्ये करण्यात आली. भिसे कुटुंबीयांना न्याय मिळत नाहीये. खालच्या कोर्टात एका दिवसात निकाल दिला गेला. मात्र, हायकोर्टात गेल्यानंतर न्यायाधीशांनी खालच्या कोर्टाच्या त्या न्यायाधीशांचे डिमोशन केले. त्यांनी कॉलेजवर देखील कब्जा केला आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.