जालन्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये मिरची पिकाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जालना तालुक्यासह भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यातील शेतकरी आता मल्चिंगवर शेती पिके घेताना पाहायला मिळत आहे. काळानुसार शेतीमध्ये बदल होत असून शेतकरी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून मिरची, बैंगन, भाजीपाला यासह इतर पिके घेण्यासाठी आता मल्चिंगचा उपयोग करत आहे. यासाठी कृषी विभागाकडून एकरी 6 हजार 400 रुपये अनुदान देखील शेतकऱ्यांना दिले जात आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा मल्चिंगवर शेती पिके घेण्याकडे कल वाढू लागला आहे.
पोलिस अधिकारी कोंडावार अडचणीत?शिवरायांबद्दल गरळ ओकणारा प्रशांत कोरटकर याची चंद्रपुरात कथित भेट घेणारे पोलिस अधिकारी महेश गुंडावर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महेश गुंडावर हे चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख होते. मात्र त्यांची बरोबर महिनाभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. यामुळे नाराज असलेले गुंडावर तेव्हापासून कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. ते अजूनही रजेवर आहेत. दरम्यान, इंद्रजीत सावंत प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर हा अकरा मार्च रोजी चंद्रपुरात मुक्कामी आला असता त्याची भेट गुंडावार यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांनी हॉटेलचे सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून, त्यात जर कोंडावार आढळले, तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे असल्याने आपण काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिली.
Nanded: सोशल मीडियावरून तेढ निर्माण करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हे दाखलसोशल मीडिया वरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केलीय..
जानेवारी 2025 पासून नांदेड सायबर पोलिसांनी 125 इंस्टाग्राम अकाउंट ची माहिती काढून संबंधित पोलीस ठाण्याला सूचना देत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कलम 168 नुसार जिल्ह्यातील 21 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,
तर नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, कोणत्याही अफवांवर किंवा कोणत्याही आक्षेपहार्य पोस्टवर विश्वास न ठेवता त्याला व्हायरल करू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे..
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबनकोविड काळात घोटाळा केल्याचा भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.
या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधिमंडळात घोषणा..
विभागीय चौकशी तीन महिन्यात पूर्ण केली जाईल..
कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला त्यात दोषी आढळले.. कारवाई करण्याऐवजी नाशिकला बदली केली.. नमिता मुंदडा यांचा गंभीर आरोप
आणि आता परत पुन्हा बीड जिल्ह्यात बदली का?
दोषी असतील तर डॉ अशोक थोरात वरती गुन्हा दाखल करणार का?
डॉ अशोक थोरात यांच्या कामकाजाबद्दल आक्षेप असल्यामुळे 84.74 कोटी, 71 कोटी खर्च..
प्राथमिक चौकशीमध्ये डॉक्टर अशोक थोरात औषध खरेदीमध्ये सकृत दर्शनी अनियमित्ता..
अशोक थोरात यांना सस्पेंड व विभागीय चौकशी ची घोषणा तीन महिन्यात पूर्ण करावी. आरोग्यमंत्र्यांची लक्षवेधीला उत्तर देताना घोषणा..
Pandharpur: पंढरपुरात शालेय पोषण आहार निकृष्टगोरगरिबांची मुले शिकणाऱ्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं पंढरपूर मधील घटनेने पुन्हा समोर आले आहे.
पंढरपूर मध्ये शालेय पोषण आहार खाल्ल्याने 10 मुलांना उलट्या आणि जुलाब होण्याची घटना घडली आहे. शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा विद्यार्थ्यांना दिला जातोय.
अर्धवट शिजलेले, अस्वच्छ तांदूळ , उग्र वास , अस्वच्छता यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.
या प्रकरणी शालेय पोषण आहार पुरवठा करणार्या बचत गटावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
पुणे - सातारा महामार्गावरील शिवरे गावाच्या हद्दीत कार डीवायडरला धडकल्याने अपघात झाल्याची घटनाकाल संध्याकाळच्या सुमारास कार साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना शिवरे येथे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं वेगाने डीवायडरला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
अपघातात सुदैवाने जीवीतहानी नाही
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
अपघातात कारचं मात्र मोठं नुकसान
पंढरपुरात सर्वधर्मिय समाज बांधवांची शांतता बैठकरमजान ईद, हनुमान जयंती सह विविध महापुरूषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व धर्मिय प्रमुख नेते व पदाधिकारी यांची शांतता बैठक झाली. बैठकीत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जून भोसले यांनी मार्गदर्शन केले.
खडकपूर्णा धरणात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 8 बोटी केल्या उध्वस्थबुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करण्याची अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त होत्या.. त्यानुसार खडकपूर्णा धरणातून रात्रदिवस वाळू उपसा केला जात आहे.. सिंदखेडराजा एसडिओ संजय खडसे यांनी धडाकेबाज कारवाई करून आतापर्यंत धरणातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 39 बोटी जिलेटीनं च्या सहायाने उध्वस्त केल्या आहेत ..काल दिवसभर् शोध मोहीम राबवून 8 बोटी जिलेटीनं च्या साहाय्याने उध्वस्त केल्या .. त्यांच्या या कारवाईने अवैध वाळू उपसा करणाऱ्यामध्ये धडकी भरली आहे.
महादेव मुंडे प्रकरणातील तपासी अधिकारी पुन्हा बदललेसहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करणार महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास
आधी या प्रकरणाचा तपास अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे होता
सोमवारी या प्रकरणाचा तपास गेवराईचे पोलीस उपाधीक्षक एन.बी राजगुरू यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता
मात्र काही तासातच हा तपास आता केजचे सहाय्यक पोलीस आधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे देण्यात आलाय
दरम्यान महिन्याभरात या प्रकरणाचे तपासी अधिकारी तीन वेळा बदलण्यात आले आहेत
कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची प्राथमिक चौकशी सुरूचौकशीत प्रशांत कोरटकरकडून माहिती घेतली जात आहे
रिमांड बनवताना प्रथमिक चौकशी महत्त्वाची
थोड्या वेळात मेडिकलसाठी घेवून जाणार
प्रशांत कोरटकरची चौकशी संपली
रिमांड तयार करण्यात आला आहे
प्रशांत कोरटकर चा मोबाईल जप्त करायचा आहे
त्याने मोबाईल मधील डाटा डिलीट केला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते
त्याला पळून जाण्यात कोणी कोणी मदत केली त्यांचा शोध घ्यायचा आहे
त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता
अठरा पगड जातीचे लोक करताय संभाजी महाराजांचा इतिहासाचे पारायणश्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील तरूणांनी आदर्श उपक्रम सुरू केलेला आहे.. शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचा निर्णय घेत तेरा दिवसीय संभाजी या पुस्तकाचे पारायण सुरू केले आहे.. गावातील सर्व जाती धर्माचे लोक या पारायण सोहळ्यात सहभागी झाले असून मुस्लिम समाजाचे बांधवही याठिकाणी सेवा करत आहेत.. ऊंदिरगाव येथील नागरीकांनी जपलेला बंधुभाव नक्कीच आदर्श आहे.
छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील दूध हॉस्पिटल जवळ द बर्निंग कारजालना रोडवरील श्रीराम नगर स्टॉप वर कारला भीषण आग
आगीत कार जळून खाक; आधीचे कारण अस्पष्ट
मुख्य महामार्गावर जालन्याकडून येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी
बघ्यांची मोठी गर्दी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
प्रशांत कोरटकर याला दुपारी १२.३० वाजता न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यतासुरक्षेच्या संदर्भात कोल्हापूर पोलिसांकडून रात्री उशिरा न्यायालय परिसराचा आढावा
न्यायालयाच्या मधल्या सुट्टीपूर्वी कोरटकर याच्या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता
वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पोलिसांकडून प्राथमिक चौकशी करून न्यायालयात हजर केलं जाणार
२४ तासाच्या आत आरोपीला अटक करणे बंधनकारक असल्यामुळे कोरटकर याला दुपारी १२.३० वाजता न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता
Mumbai Pune : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बसला लागली आगमुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील किलोमीटर 78 जवळ शेफाली ट्रॅव्हल्स बस ला आग लागली असून बस पूर्ण जळून खाक झालेली आहे. यात कोणतीही जीवित हानी नाही. कोल्हापूर कडून मुंबई दिशेला जात असताना बस ड्रायव्हर वर्षिकेत प्रल्हाद बिराजदार हा ओव्हरटेक करत असताना चालक याचा गाडीवरचा ताबा सुटला सदर वाहन हायवेच्या खाली उतरली त्यामुळे वाहनाला आग लागली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. घटनास्थळावर तळेगाव, वडगाव, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आलेली आहे. वाहतूक सुरळीत चालू आहे
Pune News : पुणे विधानसभा निवडणुकीचा खर्च 145 कोटीवरपुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 145 कोटी खर्च झाला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा 18 कोटी जास्त खर्च झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने केली निवडणूक आयोगाकडे मागणी
राज्यात निवडणूक खर्चामध्ये मुंबई ठाण्यापाठोपाठ पुण्याचा नंबर लागतो
राज्यात नोव्हेंबर मध्ये 288 मतदारसंघात विधानसभा निवडणुका झाल्या तर पुण्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका झाल्या.
पुणे जिल्ह्यात ८८ लाख मतदारांची नोंदणी झाली होती. जिल्ह्यात आठ हजाराहून अधिक मतदान केंद्र होतील प्रत्येक मतदान केंद्रावर पायाभूत सुविधा देण्याचे आदेश दिले होते.
मुंबईमध्ये 27 विधानसभा मतदारसंघात 450 कोटी रुपये खर्च तर ठाण्यात 250 कोटी खर्च झाल्याचा अंदाज आहे. तर पुण्यात 21 मतदारसंघात 145 कोटी खर्च झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 कोटी खर्च जास्त झाला आहे.
मतदान केंद्रावर सर्व सुविधा देणे व इतर खर्च यात धरला जातो.
पुणे शहरातील केवळ १०० कॅमेऱ्यांनाच बसवण्यात येणार AI टेक्नॉलॉजी२८६६ कॅमेऱ्यांपैकी केवळ १०० सीसीटीव्ही कॅमेरामन मिळाले ए आय चे लायसन
शहराच्या महत्त्वाकांक्षी सुरक्षिततेसाठी प्रकल्पांतर्गत बसविण्यात येत असलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांपैकी केवळ शंभर कॅमेऱ्यांनामध्येच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.
शहरात पहिल्या टप्प्यात १,२०० कॅमेरे शहरातील प्रमुख चौक, गदींची ठिकरातील प्रामुपेयीक, सदाची इमारती आणि गुन्हेगारी प्रवण क्षेत्रांमध्ये बसवले जात आहेत.
पहिल्या टप्प्यात १,२०० कॅमेरे शहरातील प्रमुख चौक, गदींची ठिकाणे , बाजारपेठा, सरकारी इमारती आणि गुन्हेगारी प्रवण क्षेत्रांमध्ये बसवले जात आहेत.
तर या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ४३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे .
या कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांडर सेंटर आणि कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे.
Nanded News : नांदेडकडून गंगाखेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघातनांदेड कडून गंगाखेड जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने नादुरुस्त उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिल्याची घटना परभणीच्या दैठणा बस स्टैंड वर घडली. ही घटना सुमारे सकाळी पाच वाजता घडली असून तीन प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तर कोणतीही जीवित हानी नाही मात्र ट्रॅव्हल्स चे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे दैठणा बस स्टॅन्ड येथे वारंवार अपघात होत असल्यामुळे हे बस स्टॅन्ड अपघाताचे पॉईंट ठरले आहे.
Nashik : - नाशिकच्या सातपूरमध्ये आढळले बनावट पनीर- सावधान ! तुम्ही बनावट पनीर खाताय ?
- नाशिकच्या सातपूरमध्ये आढळले बनावट पनीर
- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई
- २३९ किलो बनावट पनीर जप्त करत केले नष्ट
- विक्रीसाठी आलेले ४८ हजारांचे पनीर जप्त करत कारवाई
Pune : पुण्यात शालेय विद्यार्थ्याचा कालव्यात पोहताना बुडून मृत्यूपोहायला गेलेल्या सातववाडी येथील समर्थ अमोल यादव (वय १४) या विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली.
आज त्याचा मृतदेह यवत जवळील बोरीऐंदी गावच्या हद्दीतील कालव्यात मिळाला.
तीन दिवसानंतर मृतदेह सापडला
समर्थ साधना विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे.पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
तो शनिवार सातववाडी येथील ग्रामदैवत बापुजी बुवा मंदिरालगत कालव्यामधील पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.
मित्रांना तो दिसला नसल्याने आरडाओरडा केली.त्यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. तीन दिवसानंतर मृतदेह सापडला.
Crime : कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडलेमुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे तसेच बांधकाम विभागाचा कनिष्ठ लिपिक तौफिक शेख या चौघांनी लाचेची मागणी केली होती तर अजिंक्य देव या खाजगी इसमाकडून लाच घेताना सापडले असल्याचे लाचलुचपत विभागाने म्हटले आहे
Nagpur : कॅन्सरवर उपचार करणाऱ्या 'लिनियर एक्सलेरेटर' मशीनचा देखभाल खर्च दरवर्षी एक कोटी रुपये- राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावर आश्चर्य व्यक्त केले
- "हा खर्च खूप जास्त आहे, खर्च कमी करणे आवश्यक आहे", याकडे न्यायालयाने लक्ष वेधले आणि राज्य सरकारला या संदर्भात आवश्यक कारवाई करण्यात सांगितले
- हे मशीन शासकीय मेडिकल रुग्णालयात स्थापन केले जाणार आहे
- यासाठी 2018 मध्ये 23.20 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली होती परंतु विविध कारणांमुळे खरेदी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही
- विविध शुल्क आणि करांमुळे मशीन ची किंमत वाढून 48 कोटी रुपये झाली आहे
- पाच वर्षाचा वॉरंटी कालावधी संपल्यानंतर या मशीनच्या देखभालीसाठी दरवर्षी एक कोटी रुपये शुल्क द्यावे लागणार आहे
Pune News ; आता बस चालवताना मोबाईल वापर, तंबाखू सेवनासाठी पी एम पी चालकांचे होणार निलंबनपी एम पी एम एल ने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत.त्यांच्या चालकांना आणि वाहकांना गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, तसेच तंबाखू-पान मसाला यांचे सेवन करणे, अशा कारणांसाठी निलंबित केले जाऊ शकते.
उत्तरेकडील वाऱ्यामुळे मच्छिमारीला ब्रेकऐन मासळी हंगामात उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. यामुळे मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे.उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना मासळी मिळालेली नाही. ऐन हंगामात मासळी मिळत मच्छिमारी अडचणीत आलीय.रामनवमीनंतर पुढे ६ एप्रिल पर्यंत मासळी मिळेल, अशी आशा मच्छीमारांना आहे.
Pune News : कॉमेडियन कुणाल कामराला अटक करण्याची मागणीस्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात पुणे शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी कामरा याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर शिवसेनेने केली आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केले आहे.
कामरा याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह पोस्ट्स, व्हिडिओ यांची तांत्रिक तपासणी करून कारवाई करावी असे तक्रारीत म्हटले आहे.
शिवसैनिकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शहर शिवसेनेकडून करण्यात आली.
Pune News : पुणे महापालिकेची पावणे पाचशे वाहने भंगारातपुणे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाच्या ताफ्यातील पावणे पाचशे वाहनांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे ही वाहने वापरणे शक्य नसल्याने त्यांचा महापालिका लिलाव करून त्यांना सेवेतून बाहेर काढणार आहे.
यासाठी आज ऑनलाइन पद्धतीने राज्य सरकारच्या एमएसटीसी या संकेतस्थळावर लिलाव होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी ही माहिती दिली.
महापालिकेकडे सध्या एकूण १,१६३ वाहने असून त्यामध्ये अधिकाऱ्यांची वाहने, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, अग्निशमन दल, अतिक्रमण विभाग, विद्युत, उद्यान, आकाश चिन्ह, मलनिःसारण यासह आदी विभागांमध्ये या वाहनांचा वापर केला जातो.
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी धोरण लागू केले आहे. १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची आरटीओ नोंदणी करून केली जात आहे. त्यानुसार, महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून ४७३ वाहने सेवेतून बाद केली असून, यातील काही वाहने २४ ते १५ वर्षे जुन्या होत्या.
Nagpur Clash News : नागपूर दंगल प्रकरणी आणखी तिघांना अटक- नागपूर दंगल प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या पोहोचली 113 वर,त्यात 12 अल्पवयीनांचा समावेश आहे
- नागपूर शहरातील नंदनवन आणि गांजा घेत परिसरातून या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे
- तिघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत
- दंगलीच्या रात्रीचे सीसीटीव्ही आणि सोशल माध्यमातील व्हिडीओच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे
- या फुटेजच्या आधारेच पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी करण्यात येणार आहे
Nagpur Court News:- विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण काय केलं याच माहिती मागील दोन वर्षापासून मुख्य सचिवांकडून मिळाली नसल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली
- तसेच येथे तीन आठवड्यात मुख्य सचिवांनी सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र दाखल करावे अन्यथा कारवाई केली जाईल अशी तंबी दिली.
- लोकनायक बापूजी आणि स्मारक समितीने ही जनहित याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी झाली.
- रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व विभागाच समन्वय ठेवून न्यायालयाला माहिती देणे अपेक्षित होते पण तस झालं नाही..
- विदर्भातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याकरता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यानी केली आहे.
Pune Crime News : १० वी, १२ वी परीक्षेतील गैरप्रकारांवर 'एफआयआरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार घडले आहेत.
परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांपैकी १४ प्रकरणांत 'एफआयआर' दाखल करण्यात आला आहे,
ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले आहेत. त्या परीक्षा केंद्रांना विभागीय मंडळांमार्फत नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सद्यस्थितीत परीक्षा केंद्रांवर घडलेल्या घटनांबाबत १४ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
उर्वरित प्रकरणांत दोषी आढळून आलेल्या व्यक्तींवर
राज्य परीक्षा मंडळांमार्फत महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मॅलप्रॅक्टिसेस अॅक्ट १९८२ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
दहावी, बारावी परीक्षांमध्ये जी गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली आहेत, त्या संबंधित विद्यार्थ्यांची नियमानुसार विभागीय मंडळस्तरावर चौकशी करण्यात येईल.
चौकशीनंतर जे विद्यार्थी दोषी आढळून येतील. त्यांच्यावर शिक्षण सूचीनुसार कारवाई करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक गैरप्रकार घडले आहेत
Pune Crime News Sivshahi Rape case : डीएनए अहवालाची प्रतिक्षास्वारगेट बलात्कार प्रकरणात डीएनए अहवालाची प्रतिक्षा
स्वारगेट घटनेला आज एक महिना पूर्ण
एक महिन्यांसाठी आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल पोलिसांना सापडेना
डीएनए अहवाल आल्यानंतर पोलिसाकडून लवकरच आरोपपत्र सादर करण्यात येणार
या प्रकरणचा तपास पुणे गुन्हे शाखा करत आहेत
Crime News : बसचालकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार,आरोपीला उमरखेड पोलीसांनी केलीय अटकयवतमाळच्या उमरखेड येथील शासकीय वस्तीगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर एसटी बसचालकाने केला अत्याचारा
उमरखेड वरून नागपूर इथे नेऊन बस चालकाने विद्यार्थीनीवर केला अत्याचार,या प्रकरणी आरोपी बस चालकाला पोलीसांनी अटक केलीय
संदीप कदम असे बस चालक आरोपीचे नाव आहे,नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत असून वस्तीगृहातील पिडीत विद्यार्थीनीवर नेहमी अत्याचार करित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
malegaon-मालेगाव मध्ये भर रस्त्यात व्यापा-याचे २५ लाख लुटलेनाशिकच्या मालेगाव शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे गावा जवळील मुंबई-आग्रा महामार्गावरुन घरी जात असलेल्या व्यापा-याची अज्ञातांनी त्याच्या गाडीची पाठीमागिल काच फोडून गाडीतून २५ लाखाची रक्कम लांबल्याची घटना घडली आहे.किराणा व्यावसायिक मनोज मुथा हे आपले किराणा दुकान बंद करुन दुकानातील रक्कम घेऊन रात्री जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची गाडी अडवली त्यानंतर पाठीमागून आलेल्या अन्य दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीची काच फोडत गाडीतील रोख रक्कम पंचवीस लाखाची रक्कम घेऊन पोबारा केला.पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
chhatrapati sambhaji nagar News - पैठण रोडवरील फारोळा गावाजवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया..पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा गावाजवळ असलेल्या मुख्यरस्त्यावरील बी जी फास्टिंग प्रा.लि कंपनी समोर १२०० व्यासाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.पैठणवरून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे पाईप फुटल्याच्या घटनेत वाढ होत चालल्याने शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.दोन दिवसांपुर्वी फारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेत उशिरापर्यंत प्रयत्न करत व्यवस्थित रित्या दुरुस्ती करत पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला होता.अशातच बिडकीन ते फारोळा रोडवरील १२०० व्यासाच्या पाईपलाईनचा एअरवॉल लिकिज झाल्याची माहिती फारोळा पंप हाऊस येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.सदरची १२०० व्यासाची जलवाहिनी रात्री फुटली असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते.
Maval News : मावळच्या महावितरण कंपनीची अजब कारभारमावळात सध्या एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच चित्र आहे. तर दुसरीकडे महावितरणाच्या मनमानी कारभाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. आपलं मार्च महिन्याचं महावितरण कंपनीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मावळत अनेक गावात नागरिकांना एका महिन्याचं दहा हजार पंधरा हजार असं बिल महावितरण विभागाकडून बिल दिलं आहे. आणि बिल भरलं नाही म्हणून वीज कट केली.
आमच्या घरात फ्रीज, कुलर, टीव्ही, गिझर नाही. अशा परिस्थितीत दहा अकरा हजार रुपये बिल कसे आले. असा प्रश्न नागरिकांनी महावितरण कंपनीला विचारला आहे. आमच्या गावात मीटरचं रीडिंग घ्यायला कधीतरी लाईनमन येतो किंवा कुठेतरी एका ठिकाणी बसून आपल्याच मनाने रीडिंग टाकून बिल नागरिकांना पाठविले जाते. मात्र नागरिकांच्या मागे बिल भरा बिल भरा असा तकादा लावला जातो. एक तर मीटर प्रमाणे बिल दिले जात नाही दुसरीकडे घरामध्ये लहान मुलं असतात सूर्य आग ओळखत आहे अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं असा प्रश्न नागरिकांपुढे उभा ठाकला आहे...
Fire News : अंबरनाथमध्ये कोंबड्यांच्या ट्रकला लागली आगअंबरनाथमध्ये कोंबड्यांच्या ट्रकला आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. बारकूपाडा परिसरातून रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या पुलावर हे कोंबड्यांचे रिकामे ट्रक रात्रीच्या वेळी उभे करून ठेवण्यात आले होते.
Crime News : उल्हासनगरात महिलांनी दुकानातून पाण्याची मोटर चोरलीउल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील सेक्शन २७ परिसरात जय भवानी प्लंबिंग नावाचं दुकान आहे. या दुकानात दुपारच्या सुमारास २ महिला आल्या, त्यापैकी एका महिलेने दुकानदाराचं लक्ष नसल्याची संधी साधत दुकानाच्या ओट्यावर ठेवलेली नवी कोरी पाण्याची मोटर उचलून नेली आणि दुसऱ्या महिलेच्या हातात दिली. यानंतर या दोन्ही महिलांनी पोबारा केला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shahapur Live News : चालत्या आयशर टेम्पो ला लागली आगमुंबई नाशिक महामार्गावर चालत्या आयशर टेम्पोने मध्ये रात्रीच्या सुमारास अचानक पेट घेतल्यानं मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कुकंबा फाट्या जवळ मध्ये रात्रीच्या सुमारास नाशिक हून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो जात असताना गाडीतून धुर येत असल्याचे लक्ष्यात येताच चालकाने टेम्पो बाजूला घेताच टेम्पो ने पेट घेतला हे सर्व पाहून आयशर टेम्पो चा चालक घाबरून गेला या आगीची माहिती जीवरक्षक टिमच्या सदस्यांना मिळताच त्यांनी तत्काळ खर्डी पोलिसांशी संपर्क केला घटनास्थळी खर्डी पोलिस स्टेशन चे शिवकुमार जाधव व त्यांचे पोलिस कर्मचारी दाखल होत खाजगी टॅक्कर च्या साह्याने ही आग विजवली मात्र हे सर्व दृष पाहून टेम्पो चा मालक घाबरून गेल्याने त्याला खर्डी येथील रूग्णालयात दाखल केले. सध्या तरी मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या गाडीला आग लागण्याच्या घटने दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे अश्या घटना वारंवार होवू नये म्हणून चालकाने देखील वाहतूकीच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जर वाहतूकीचे नियम काटेकोरपणे पालले तर अश्या घटनेपासून वाचू शकतो.
Akola News : अकोला महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त आज सादर होणार....अकोला महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प असणार आहे.. अकोला महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेकडून मालमत्ता कर व पाणी दरात वाढ होणार का?, कोणत्या क्षेत्रांना अधिक निधी मिळणार?, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे. त्याशिवाय कोणत्या विभागासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Raigad News : बॉक्साइटची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघातबॉक्साइटची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे घडली आहे. निजामुद्दीन अन्सारी असे मृताचे नाव आहे. रायगडच्या श्रीवर्धन गोरेगाव मार्गावर म्हसळा शहराजवळ डोंगरात तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटून डंपर डोंगरावर जाऊन आदळला. या अपघातात केबिनचा चक्काचूर झाला.
Prashant koratkar arrested : प्रशांत कोरटकर प्रकरणात आत्तापर्यंत काय काय झालं?- २५ फेब्रुवारी रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याजवळ महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान आणि जीवे मारण्याची धमकी
- २५ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
- भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६,१९७,२९९,३०२,१५१, ३५२ अन्वये गुन्हा दाखल
- कोरटकर याचे सोशल मिडिया तपासले गेले तेव्हा अनेक दिग्गज व्यक्तींसोबत त्याचे फोटो मिळून आले
- २६ फेब्रुवारीला कोरटकर ने त्याच्या नागपूर मधील निवासस्थानातून पळ काढला
- २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला किती आदर आहे याचा व्हिडिओ झाला व्हायरल
- २८ फेब्रुवारी रोजी त्याचा अंतरिम जामीन मंजूर झाला
- ३ मार्च रोजी कोरटकर याचे आलिशान कारसोबत चे फोटो आणि व्हिडिओ आले समोर
- ११ मार्च रोजी पुन्हा सुनावणी, यावेळी सुद्धा त्याला १७ मार्च पर्यंत दिलासा
- १८ मार्चला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केला
- २२ मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर विरोधात लुक आऊट नोटीस नोटीस केली जारी
- २३ मार्च ला कोरटकर याला तेलंगणा मधून पोलिसांनी घेतले ताब्यात
Prashant koratkar arrested : प्रशांत कोरटकराला घेऊन पोलीस कोल्हापूरमध्ये दाखलप्रशांत कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचलं आहे. काही वेळातच प्रशांत कोरटकरला राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे.