गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) निराशाजनक सुरुवात झाली. केकेआरला आरसीबीविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. केकेआरचे फिरकीपटू आरसीबीविरुद्ध निष्प्रभ ठरले. मात्र या फिरकीपटूंना केकेआरविरुद्धच्या सामन्यात गुवाहाटीत सूर गवसला आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि मोईन अली या फिरकी जोडीने एकूण 4 विकेट्स घेतल्या या दोघांनी एकूण 8 ओव्हरमध्ये फक्त 40 धावाच दिल्या. वरुणने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अप्रतिम कामगिरी केली. वरुणने तशीच कामगिरी केकेआरविरुद्ध केली आणि फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडलं.
वरुण चक्रवर्ती बॉलिंग करायला आला. राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने वरुणच्या ओव्हरमधील तिसऱ्याच बॉलवर सिक्स ठोकला. मात्र वरुणने 2 बॉलनंतर पलटवार केला. वरुणने रियानने आपल्या चक्रव्यूव्हात अडकवलं. वरुणने त्यानंतर राजस्थानला आणखी एक धक्का दिला. वरुणने वानिंदु हसरंगा याला आऊट केलं. वरुणने अशाप्रकारे आपला 4 ओव्हरचा कोटा पूर्ण केला. वरुणने या 4 ओव्हरपैकी 13 बॉल डॉट टाकले. टी 20 क्रिकेटमध्ये इतके बॉल डॉट टाकणं मोठी बाब आहे.
मोईन अली याला सुनील नारायण याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. मोईनने नारायणच्या अनुपस्थितीत आपली भूमिका चोखपणे पार पाडली आणि टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवला. मोईनने 4 ओव्हरमध्ये 23 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. मोईनने यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान राजस्थानचे फलंदाज केकेआरच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. राजस्थानच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. राजस्थानसाठी ध्रुव जुरेल याने सर्वाधिक 33 धावा केल्या. केकेआरच्या गोलंदाजांसमोर ध्रुव व्यतिरिक्त एकालाही 30 पार मजल मारता आली नाही.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.