World Theatre Day 2025: आज 27 मार्च जगभरात हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. रंगभूमी दिनाच्या या खास दिवशी, जगभरातील कलाकारांना त्यांच्या कलेचा सन्मान मिळवण्याची आणि कलेच्या महत्त्वाची जाणीव करून देण्याची संधी मिळते.
रंगभूमी फक्त मनोरंजनाचे साधन नाही, तर ती समाजातील विविध विचार, भावना आणि संस्कृतीचा संगम आहे. यामध्ये अभिनेता, नर्तक, संगीतकार, दिग्दर्शक आणि इतर कलावंत आपल्या कला आणि कलेच्या माध्यमातून लोकांचे मन जिंकतात.
प्रियजनांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छाजागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने, आपले मित्र आणि प्रियजन यांना शुभेच्छा देणे, त्यांच्या कलेचा आदर दाखवण्याची सर्वोत्तम वेळ आहे. तुमच्या कलाकार मित्र-मैत्रीणींना रंगभूमीच्या या खास दिवशी शुभेच्छा देऊन त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन द्या.
मराठमोळ्या शुभेच्छा संदेश"रंगभूमी दिनाच्या विशेष दिवशी, तुमच्या अभिनयाने रंगलेल्या रंगभूमीला सलाम! तुमचं प्रत्येक पाऊल रंगभूमीला नव्या उंचीवर घेऊन जातं. शुभेच्छा!"
"तुमच्या कलेच्या माध्यमें जगाला एक सुंदर संदेश देणाऱ्या कलाकारांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
"आजच्या रंगभूमी दिनी तुमच्या कलेला सलाम! तुमच्या अभिनयाने रंगभूमीला जीवन दिलं आहे."
"कलाकारांसाठी रंगभूमी दिन म्हणजेच एक महोत्सव, तुमच्या कलेचा प्रत्येक रंग जगाच्या ह्रदयात घर करतो. रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!
"तुमच्या अभिनयाने रंगभूमीला खूप काही दिलं आहे. रंगभूमी दिनाच्या या दिवशी, तुम्हाला प्रेम आणि शुभेच्छा!"