विजय पाटील, साम टीव्ही
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने करणी आणि भानामतीचा प्रकार केला आहे. पहाटे महिलेने दार उघडले. तेव्हा त्यांच्या दाराबाहेर जादूटोण्याचे साहित्य आढळून आले.
बकऱ्याची मुंडके, सुई टोचलेल्या लिंबू, तसेच तीन नारळाला काळ्या बाहुल्या बांधल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजीव बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलाचे प्रबोधन केले.
उरून भागात एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेला त्यांच्या घराबाहेर जादूटोणा करण्याचे साहित्य आढळून आले. महिलेच्या दारात बकऱ्याचं मुंडकं, बकऱ्याची चार पाय रंगीत दोरीने बांधलेले होते. त्यावर लिंबू, सुई आणि पिना टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळ्या बाहुल्या दोरीने बांधून त्यावरही टाचण्या टोचल्या होत्या.
तर, २१ अर्ध कापलेले लिंबू त्यावरही सुई टोचलेल्या होत्या. शिवाय मिरच्या, पपईच्या तुकड्यांवर हळद कुंकू वाहिलेल्या होत्या. याची माहिती मिळताच परिसरातील दाराजवळ गर्दी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजीव बनसोडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली.
संजीव बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेच्या कुटुंबाचे आणि नागरिकांचे प्रबोधन केले. तसेच त्यांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.