छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सतत नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
छत्रपती शिवरायांचा काळ कसा होता? महाराज कसे राहत होते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
दिवाळी असो की कोणताही शुभकार्यक्रम, आपण नवीन कपडे घालतो.
पण राज्याभिषेकावेळी आपल्या राजांचा पोशाख कसा होता? हा प्रश्न देखील अनेकांना पडतो. त्याचेच उत्तर खाली दिले आहे.
राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी विशेष वस्त्रभूषणे परिधान केली होती.
त्यांची पट्टराणी सोयराबाई हिच्या महावस्त्राच्या पदराचे एक टोक आणि महाराजांच्या अंगरख्याचे एक टोक यांची विवाहातील प्रथेप्रमाणे गाठ मारण्यात आली होती.
महाराज आणि सोयराबाई ऐंद्रियशांती विधीसाठी चौरंग आणि पादपीठ यांवर बसले, तर त्यांच्या मागे संभाजीराजांना स्थान देण्यात आले.
पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्या अधिपत्याखाली महाराजांचे अष्टप्रधान मंडळ नद्यांच्या पवित्र जलाने भरलेले कलश घेऊन सभोवती उभे होते.
वेदमंत्रांचे घोष सुरू होते, आणि १६ सुहासिनी पंचारती करत होत्या.
पोशाखया सोहळ्यासाठी महाराजांनी उंची केशरी रंगाचा पोशाख परिधान केला होता.
या पोशाखावर सोन्याची आकर्षक नक्षी होती. मस्तकावर मोत्यांच्या माळांनी सुशोभित राजमुकुट होता.
त्यांच्या कानात रत्नजडित कर्णभूषण चमकत होते, तर गळ्यात हिऱ्या-मोत्यांचे आलंकारिक हार होते.
महाराजांनी विधीनंतर गुरुजनांना वंदन केले आणि जिजाऊंना साष्टांग नमस्कार केला. जिजाऊंनी आपल्या पराक्रमी पुत्राला आशीर्वाद दिले आणि आनंदाश्रू ढाळले.
राज्याभिषेक सोहळ्यात शिवरायांचा पोशाख दैदिप्यमान होता – केशरी वस्त्र, सोन्याची नक्षी, मोत्यांचा मुकुट आणि रत्नजडित दागिने, यामुळे त्यांच्या शौर्याला साजेसे वैभव दिसत होते.
मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते 'कनेक्शन' आहे?