Rashmika Mandanna: 'या' अभिनेत्रीला हिंदी बोलताना आजही वाटते भिती; तरीही मिळाले तीन सुपरहिट चित्रपट
Saam TV March 29, 2025 07:45 PM

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने दक्षिणेकडील दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली असून आता रश्मिका हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मिकाने अॅनिमल, छावा सारख्या सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले असून लवकरच तिचा सलमान खानसोबत 'सिकंदर' आणि आयुष्मान खुरानासोबत 'थमा' प्रदर्शित होणार आहे.

कर्नाटकात जन्मलेली आणि वाढलेली असल्याने हिंदी चांगले बोलता येणे तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते.परंतु गेल्या काही वर्षांत तिने त्यावर काम केले आहे. खरं तर, सीएनएन-न्यूज १८ ला दिलेल्या तिच्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की जेव्हा तिला हिंदी भाषा बोलावी लागते तेव्हा ती आजही खूप घाबरते. तिने सांगितले की जेव्हा तुम्ही शहरात राहता आणि तुमच्या आजूबाजूला लोक त्या भाषेत बोलतात तेव्हा ती भाषा शिकणे सोपे असते. ती कर्नाटकात वाढली म्हणून तिला फक्त कन्नड आणि इंग्रजी भाषा बोलता येते. ती तिच्या चित्रपट कारकिर्दीसाठी हैदराबादला गेली होती तिच्या सहाय्यकांपासून ते बॉडीग्राउंडपर्यंत तिच्या कर्मचाऱ्यांमधील सर्वजण तेलुगूमध्ये संवाद साधत होते, म्हणून तिला त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषा शिकावी लागली.

पुढे रश्मिकाने असेही सांगितले की जर तिने मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला तर ती हिंदी भाषा खूप सहजपणे आत्मसात करू शकेल. पण सलमान खानने तिला सांगितले, जरी ती मुंबईत कामासाठीच फक्त आली तरी ती हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवू शकणार नाही कारण त्यावेळी तिच्या आजूबाजूचे सर्वजण फक्त इंग्रजीत बोलत असतील.

कडे 'कुबेरा', 'द गर्लफ्रेंड', 'अॅनिमल पार्क' आणि 'पुष्पा ३' पर्यंत विविध भाषांमधील चित्रपट आहेत. खरं तर, ती ५०० कोटींच्या क्लबमध्ये तीन चित्रपट असलेली एकमेव अभिनेत्री बनली आहे. 'अॅनिमल', 'पुष्पा २-द रुल' आणि '' हे तिचे ५०० कोटींचा टप्पा गाठणारे चित्रपट आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.