प्रत्येकजण बदलत्या ऋतुमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेत असतात. अशातच तुमची त्वचा कोरडी असेल आणि निस्तेज वाटत असेल तर ते त्वचेतील ओलाव्याच्या कमतरतेमुळे असू शकते. यासाठी तुम्ही योग्य टोनर वापरून तुम्ही तुमची त्वचा हायड्रेटेड आणि फ्रेश ठेवण्यास मदत होईल. बाजारात उपलब्ध असलेल्या टोनरमध्ये अनेक प्रकारची कॅमिकल असतात,ज्यामुळे काहीकाळ त्वचा हायड्रेटेड राहते पण नंतर त्वचा अधिकच कोरडी होऊ शकते. म्हणून तुम्ही घरगुती टोनरचा वापर करून सर्वोत्तम असा नैसर्गिक पर्याय निवडु शकता. हे केवळ त्वचेला हायड्रेट करणार नाही तर ते त्वचेला चमकदार आणि मऊ देखील करतात.
कोरडी त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी घरगुती टोनर हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे टोनर नैसर्गिक आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या रसायनांपासून मुक्त आहेत. या घरगुती टोनरचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार बनवू शकता. कोरड्या त्वचेसाठी घरी सहज बनवता येणारे काही सर्वोत्तम घरगुती टोनर आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात…
हे टोनर वापरून पहा
तुमची त्वचा खुपचच कोरडी असेल त्या यासाठी गुलाब पाणी हे सर्वोत्तम नैसर्गिक टोनर आहे. कारण हे गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचा फ्रेश ठेवते. यासाठी, शुद्ध गुलाबपाणी घ्या आणि ते स्प्रे बाटलीत भरा. दिवसातून २-३ वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा कापसाच्या सहाय्याने लावा. यामुळे त्वचेला त्वरित ओलावा मिळतो आणि त्वचा हेल्दी राहते.
काकडी खूप थंड असते. त्यामुळे आपण अनेकदा पाहिले असेलच की अनेक लोकं काकडीचे काप करून डोळ्यांवर लावता. जेणेकरून डोळ्यांना थंडावा मिळतो आणि ताण देखील कमी होतो. अशातच तुमच्या त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि हायड्रेट करण्यास करण्यासाठी काकडीच्या रसाचा वापर टोनर म्हणून करा. यासाठी काकडी किसून त्याचा रस काढा. आता हा रस एका स्प्रे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. दिवसातून दोनदा चेहऱ्यावर लावा. हे टोनर त्वचेला थंड करते, कोरडेपणा कमी करते आणि त्वचा चमकदार बनवते.
कोरफड जेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि कोरडेपणा कमी करते. यासाठी तुम्ही घरच्या घरी कोरफड टोनर बनवुन चेहऱ्यावर लावा. कोरफड टोनर बनवण्यासाठी २ चमचे कोरफड जेल घ्या आणि त्यात १ कप डिस्टिल्ड वॉटर मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. ते दररोज चेहऱ्यावर लावा, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहील.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा निरोगी आणि हेल्दी बनवतात. अशातच तुमची त्वचा जर कोरडी असेल तर तुम्ही ग्रीन टी टोनर बनवुन त्वचेवर लावा. यासाठी तुम्ही सर्वात प्रथम तुम्हाला गरम पाण्यात ग्रीन टी बॅग ठेवा. त्यांनतर हे पाणी थंड झाल्यावर ते स्प्रे बाटलीत भरा. हे टोनर दिवसातून दोनदा लावा, ज्यामुळे त्वचेला खोलवर हायड्रेशन मिळेल आणि त्वचा चमकदार दिसेल.
कोरडी त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी घरगुती टोनर हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे टोनर नैसर्गिक आहेत. गुलाबपाणी, काकडी, कोरफड, ग्रीन टी आणि नारळपाणी यांसारखे घरगुती टोनर वापरून तुम्ही तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार बनवू शकता. मात्र हे लक्षात ठेवा की, तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची ऍलर्जी असेल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल तर यापैकी कोणताही उपाय त्वचेवर वापरण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)