गिरीश महाजन: लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये महिलांना कधी मिळमार असा सवाल सर्वत्र केला जात आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. पुढील पाच वर्षात कधीही आणि केव्हाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात होईल. स्पष्टपणे बहुमत असल्याने सरकार पाच वर्षे काम करणार आहे असे महाजन म्हणाले. पुढील पाच वर्ष 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार नाही, या नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन म्हणाले की, नीलमताई असे काहीही म्हणाल्या नाहीत.
अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळं त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे काही वक्तव्य केले असेल ते विचारपूर्वक केला असेल. लाडकी बहीण योजनेचे राज्यात 41 हजार कोटींचं बजेट आहे. त्यामुळे कदाचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. एक-दोन वर्षात अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा विचार केला जाईल, असे देखील मंत्री महाजन म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले म्हणतात ते बरोबर आहे वारंवार महापुरुषांचा अवमान केला जात आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजेत वायफळ बडबड करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून पुढच्या काळात बोलताना कोणाची हिंमत होणार नाही असे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट झालेले आहे, कोरटकर नावाचा असा कोणताही कर्मचारी नव्हता. यात कोणताही पुरावा नसताना त्यात काही तथ्य नाही. असं उगाच कोणाचेही नाव घ्यायचं आणि प्रसिद्धी मिळावी यासाठी कोणी काहीही बोलतात हे चुकीचं आहे असे महाजन म्हणाले.
कुणाल कामरा यांनी जे काही मोठं स्टेटमेंट केलेले आहे.,त्यामुळे ते स्वतः आता घाबरत आहेत. पण कोण कोणाला मारेल कायदा आहे, त्याच्यावर कारवाई होईल असे महाजन म्हणाले. जळगाव कार्यालयात जिल्हा बैठक झाली. पक्ष संघटनेसाठी या बैठकीच्या आयोजन केले होते. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे नेहमीप्रमाणे आगामी काळात देखील भाजप निवडणुकीत नंबर 1 राहणार आहे. भाजप सदस्य नोंदणीचे जे टार्गेट दिला आहे, ते टार्गेट पूर्ण करणार आहेत आणि संघटनात्मक दृष्ट्या जळगाव जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या पुढे आहे हे, पुन्हा सिद्ध करून दाखवायचे आहे असे महाजन म्हणाले. भाजप पक्ष हा घराणेशाहीवर चालणार नाही. हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आजवर भाजपचे अनेक दिग्गजांनी अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..