मोठी बातमी! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात; तर घरगुती सिलिंडरची किंमत काय?
Marathi April 01, 2025 11:24 AM

गॅस किंमती: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दरवर्षी तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमतीत बदल करत असतात. त्याच अनुषंगाने ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आता 41 रुपयांची कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आज म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू असणार आहे. या नवीन कपातीनंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1714.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1755.50 रुपये इतकी होती. परिणामी या नव्या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना ही मोठा दिलासा मिळाला आहे.

घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची कपात करण्यात आली असताना, घरगुती गॅस सिलिंडरसाठी किती पैसे मोजावे लागणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल.  मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14. 2 किलोच्या दरात कुठलीही दरवाढ अथवा कापत केलेली नाही. 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802. 50 रुपये तर चेन्नईमध्ये 818. 50 रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्वसांमन्य जनतेला याचा कोणताही दिलासा अद्याप तरी होणार नाहीये. त्यामुळे आता चाकरमान्यांची काहीशी निराशा झाली असल्याचे बोलले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.