मळगाव-तेलकाटावाडीचे पथदिवे तातडीने सुरू करा
esakal April 02, 2025 01:45 AM

54857

मळगाव-तेलकाटावाडीचे
पथदिवे तातडीने सुरू करा

ग्रामस्थांची मागणी; ग्रामपंचायतीस निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, ‘‘तेलकाटावाडी येथील पथदिवे दीड वर्षांपासून बंद आहेत. तेलकाटावाडी ग्रामस्थ रात्रीच्या वेळी अडगळीच्या रस्त्याने ये-जा करत असतात. येथील पथदिवे बंद असल्याने त्यांना नाहक त्रास होत आहे. तरी रस्त्याचे पथदिवे तातडीने सुरू करावेत.’’ दरम्यान, निवेदनाला पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येथील पथदिव्यांवर वाढलेल्या झाडीमुळे अडथळा होत आहे; मात्र झाडी लवकरात लवकर तोडून पथदिवे सुरू करून देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी गोविंद उर्फ महेश गवंडे, शंभा सावंत, सहदेव राऊळ, वैजनाथ देवण, संजय खानोलकर, नामदेव नाटेकर, अंकुश शेटकर, विश्वनाथ गोसावी, सिद्धेश तेंडोलकर, विठ्ठल गोसावी, चिन्मय गवंडे आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.