54859
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी
ई-बाईकची गरज ः पाटील
पिंगुळीत ‘एडीएमएस’चे शो-रूम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः आपला देश प्रदूषणमुक्त होण्यासाठी ई-बाईक महत्त्वाची आहे. वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी ग्राहक वर्गाने ई-बाईकला पसंती दिली आहे, असे प्रतिपादन एडीएमएस ई-बाईक कंपनीचे मुख्य वरिष्ठ अधिकारी विनायक पाटील यांनी पिंगुळी येथे केले.
या कंपनीच्या पहिल्या शोरूमचे उद्घाटन गुढीपाडवादिनी संत सद्गुरू सत्यवानदादा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते दादा बिर्जे यांनी एडीएमएस ई-बाईक कंपनीच्या पहिल्या शो-रूमचे उद्घाटन केले.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, ‘‘आपला भारत देश प्रदूषणमुक्त होण्यासाठी ई-बाईक शो-रूम सर्व ठिकाणी सुरू होत आहेत. बेळगाव, गोवा या ठिकाणी या कंपनीचे शो-रूम असून, बेळगाव या ठिकाणी या गाड्या बनवल्या जातात. जिल्ह्यात या कंपनीचे शोरूम मंगलमूर्ती इंजिनिअर या ठिकाणी आज गुढीपाडव्याच्या दिनी सुरू होत आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व्हिस सेंटरही असणार आहे.’’ कंपनीचे अधिकारी नामदेव पाटील यांनी, ग्राहकांना ई-बाईक देताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीने विशेष काळजी घेतली आहे. अधिक नावीन्यपूर्ण सेवा कशा देता येतील, या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास करून सेवा देऊ. या कंपनीची १८ मॉडेल असून, मोपेडसह साथी व साथी प्लस या सर्वच गाड्यांना चांगली पसंती मिळत आहे, असे सांगितले. राजेश वेर्णेकर, नीलेश मुरकुटे, सुभाष शिंदे, नामदेव पाटील, राजेंद्र पट्टण, भगवान दळवी, विनायक मिटकेकर, शोभा बिर्जे, राजू बिर्जे, सुंदर मेस्त्री, साक्षी बिर्जे, संदीप बिर्जे, संजय बिर्जे, ईश्वर प्रभू, श्रीमती पट्टण, महेश हुले, नाना राऊळ, जयप्रकाश प्रभू, डॉ. रमेश यादव, राकेश घाडी, विजय शिंत्रे, सौ. शिंत्रे, बाबासाहेब पाटील, गीतांजली बिर्जे, श्रेया बिर्जे, उमेश देसाई, अरुण पवार, संतोष सांगळे, प्रसाद परब, सौ. परब आदी उपस्थित होते.