श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय, लखनौला 8 गडी राखून नमवलं
GH News April 02, 2025 02:06 AM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 13 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा वरचष्मा दिसला. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सने दिलेलं आव्हान 17 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. सुरुवातीला मिळालेल्या धक्क्यामुळे धावगती मंदावली. पॉवर प्लेमध्ये 4 गडी गमवून 39 धावा करता आल्या. 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पंजाब किंग्सने 17 व्या षटकात पूर्ण केलं. 2 विकेट गमवून पंजाब किंग्सने हे आव्हान गाठलं. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने 34 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 69 धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने विजयी षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयस अय्यरने 30 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारून नाबाद 52 धावा केल्या.

पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितलं की, ‘ही धावसंख्या पुरेशी नव्हती, आम्हाला 20-25 धावा कमी पडल्या. पण तो खेळाचा एक भाग आहे. अजूनही आमच्या घरच्या मैदानावरील परिस्थितीचा आढावा घेत आहोत. जेव्हा तुम्ही लवकर विकेट गमावता तेव्हा मोठी धावसंख्या उभारणे नेहमीच कठीण असते, परंतु प्रत्येक खेळाडू खेळ पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. संथ विकेट मिळवण्याचा विचार होता. मला वाटते की संथ चेंडू टिकून राहिले. आम्हाला या सामन्यातून शिकायला मिळाले आणि पुढे जायला मिळाले. बरेच सकारात्मक पैलू आहेत, जास्त काही सांगता येत नाही.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.