Pune : रुग्णालयाचा हलगर्जीपणा? जन्म होताच जुळ्या बाळांची माय दगावली; भाजप आमदाराच्या PAवर दु:खाचा डोंगर
Saam TV April 04, 2025 05:45 AM

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितले. त्यातील काही रक्कम भरल्यानंतरही गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले नाही. त्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला, असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केलाय. पुण्यातील घटनेने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे ही दुर्दैवी घटना भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्यासोबत घडली आहे. सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय सहायक आहेत. सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे ही गरोदर असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

मात्रउपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयाकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. मात्र कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो, असं सांगितले. दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती मोनाली भिसे हिला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटल पाठवलं होतं. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला.

जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे, असा आरोप अमित गोरखे यांनी केला आहे. दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी या संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्रीयांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.