Free Fire MAX प्लेअर्ससाठी गेममधील आगामी अपडेट Free Fire MAX OB49 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या गेमच्या अपडेटची अपेक्षित रिलीज डेट समोर आली आहे. हे अपडेट येत्या काहीच दिवसांत प्लेअर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, आगामी अपडेटमुळे प्लेअर्सचा गेमिंग अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या अपडेटमुळे, प्लेअर्सना गेममध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
Lava Bold 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 11 हजारांहून कमी आहे किंमत! कर्व्ड डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज
सर्व प्लेअर्ससाठी अपडेट रिलीज करण्यापूर्वी कंपनी नेहमी त्यांच्या अपडेटचे अॅडव्हान्स सर्व्हर देखील रिलीज करते. त्याचप्रमाणे आता आगामी अपडेटचे अॅडव्हान्स सर्व्हर देखील रिलीज केलं जाणार आहे. यामध्ये प्लेअर्सना आगामी अपडेटची चाचणी करण्याची संधी मिळते. शिवाय आगामी अपडेटमध्ये काही त्रुटी आहेत, हे देखील प्लेअर्स सांगू शकतात. तुम्हाला देखील या अॅडव्हान्स सर्व्हरची चाचणी करायची असेल तर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतर कंपनीने निवडलेल्या काही भाग्यवान खेळाडूंना या अपडेटमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire MAX OB49 अपडेट अॅडव्हान्स सर्व्हरची अधिकृत रिलीज तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि, लीक झालेल्या अहवालानुसार, गरिना 9 एप्रिल 2025 रोजी येणाऱ्या अपडेटसाठी अॅडव्हान्स सर्व्हर रिलीज करेल. यानंतर, गरिना एप्रिलच्या मध्यात अपडेट रिलीज करू शकते. प्लेअर्सना अॅडव्हान्स सर्व्हरसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर, गरिना काही निवडक प्लेअर्सना एक अॅक्टिव्हेशन कोड पाठवेल. या अॅक्टिव्हेशन कोडद्वारे, गेमर्सना अॅडव्हान्स सर्व्हरमध्ये प्रवेश करता येईल. प्रगत सर्व्हर वापरणाऱ्या प्लेअर्सना केवळ अपडेटसोबत येणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांचा अनुभव घेता येत नाही तर अपडेटमधील बग्सची तक्रार करून, तुम्ही इन-गेम चलन डायमंड्ससह अनेक रिवॉर्ड्स देखील मिळवू शकता.
फ्री फायर प्लेअर्स नेहमीच रिडीम कोडच्या शोधात असतात, ज्यामुळे त्यांना काहीही न करता नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. आता आम्ही तुम्हाला आजसाठी व्हॅलिड असणारे रिडीम कोड सांगणार आहोत.
Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी