Sanjiv Goenka: IPLमध्ये हरल्यानंतरही संजीव गोयंकांना मिळणार हजारो कोटी रुपये; कसे आहे BCCIचे बिझनेस मॉडेल?
esakal April 04, 2025 07:45 PM

Sanjiv Goenka IPL 2025: संजीव गोयंका यांनी लखनऊला 7000 कोटींना विकत घेतले. आता लोकांना वाटत आहे की हा तोट्याचा सौदा आहे कारण आयपीएल जिंकल्यानंतर त्यांना फक्त 20 कोटी रुपये मिळतील. पण आयपीएलचे बिझनेस मॉडेल असे आहे की लखनऊ पुढील 10 वर्षे प्रत्येक हंगामात सर्व सामने हरले तरी त्यांचे पैसे प्रॉफिटसह वसूल केले जातील. कसं ते जाणून घ्या

संजीव गोयंका आणि एलएसजीचा करार

संजीव गोयंका यांना बीसीसीआयला केवळ एका वर्षात नाही तर 10 वर्षांत 7000 कोटी रुपये द्यायचे आहेत. तर, बीसीसीआयच्या एका वर्षाच्या खर्चात 700 कोटी रुपये हप्ता, 100 कोटी रुपये खेळाडूंचा पगार, 200 कोटी रुपये हॉटेल, प्रशिक्षक आणि इतर सर्व खर्च समाविष्ट आहे. तर एक वर्षाचा एकूण खर्च 1000 कोटी रुपये होआहे.

कमाई कशी होते?

आता जर आपण त्यांच्या कमाईबद्दल बोललो तर त्यांची सर्वात मोठी कमाई प्रसारण हक्कातून होते. बीसीसीआयने 2023 ते 2027 पर्यंतचे प्रसारण हक्क 49,000 कोटी रुपयांना विकले आहेत.

एका वर्षासाठी प्रसारण हक्कांची कमाई 10,000 कोटी रुपये आहे, त्यातील 50% म्हणजे 5000 कोटी रुपये घेणार आहे आणि उर्वरित 5000 कोटी रुपये त्या 10 संघांमध्ये वितरित केले जातील. त्यामुळे लखनौला 500 कोटी रुपये मिळतील.

मग त्यांच्या जर्सीमध्ये असलेल्या सर्व ब्रँडसाठी केलेल्या सर्व मार्केटिंगमधून ते 200 कोटी रुपये कमावतात. स्टेडियमच्या तिकीट विक्रीतून 100 कोटी रुपये मिळवतात. त्यामुळे त्यांची एकूण कमाई 800 कोटी रुपये होते. याचा अर्थ त्यांना दरवर्षी 200 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

10 वर्षांत 7 हजार कोटी रुपयांचे मूल्यांकन किती असेल?

पण आता यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 10 वर्षांत मूल्यांकन 25 ते 30,000 कोटी रुपयांवर पोहोचेल कारण आयपीएल संघ हे एखाद्या स्टार्टअप कंपनीसारखे आहे आणि त्यांचे मूल्यांकन कालांतराने वाढत जाते.

उदाहरणार्थ, 2008 मध्ये राजस्थान संघाचे मूल्यांकन सुमारे 284 कोटी रुपये होते, जे आता 6000 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे आणि नंतर संजीव गोयंका यांनी त्यांच्या संघाचे फक्त 10% शेअर्स विकले तर त्यांना 500 कोटी रुपयांचा नफा होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.