दररोज 9-10 तास अभ्यास करुन राधिका गुप्ता यांनी 2022 ची UPSC परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
मध्य प्रदेशातील अलिराजपूरच्या रहिवासी असलेल्या राधिका गुप्ता दिल्ली विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.
UPSC परीक्षेची तयारी सुरु करत त्यांनी UPSC परीक्षेत 18 वा रँक मिळवला. आणि राज्यातील परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या.
त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली, मात्र त्यांना कमी रँक मिळाल्यानं त्यांची नियुक्ती इंडियन रेल्वे सर्विससाठी करण्यात आली होती.
लहानपणापासून IAS अधिकारी होण्याचं स्वप्न असल्यानं त्यांनी परीक्षेची तयारी सुरु ठेवली. त्या जाॅब करत दररोज 8 ते 9 तास अभ्यास करत त्यांनी IAS होण्याचं स्वप्न 2020 ला पूर्ण केलं.
मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या 'सक्सेस मंत्र' या कार्यक्रमात बोलताना राधिका म्हणाल्या, 'मी त्या जिल्ह्यातून येते ज्या जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे, परंतु त्यामुळेच माझे व्यक्तिमत्व घडले आहे.' माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्टी आहे.
परीक्षेच्या तयारीसाठी त्या इंदूरला गेल्या होत्या, मात्र थोड्या दिवसांनी परत येत त्यांनी अलीराजपूर येथे परीक्षेची तयारी सुरु केली.
"इथे राहिल्यानंतरच मला समजले की, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षण किती महत्त्वाची भूमिका असते. मी आयुष्यातील अनेक महत्त्वाचे गोष्टी इथेच शिकले. या परीक्षेने मला श्रम आणि संयम शिकवला आहे. असं त्या म्हणाल्या.