मराठमोळी प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता माळीच्या नवीन प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या आजोळचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती कावडीचे दर्शन घेताना सहकुटुंब दिसत आहे. प्राजक्ताने आजोळी जाऊन नवस फेडला आहे.
"गावची कावड...
नायकाची भाळवणी- - आजोळ, नवसफेड
कावडीमागची गोष्ट
शिंदे - लोखंडे - जीवाभावाचे मित्र. लोखंडेंनी शिखरशिंगणापूरला राजाकडून मान- निशाणी मिळवण्यासाठी दांडपट्ट्यामध्ये जिंकून तो मिळविण्याचा पण केला. ते जिंकले, मान मिळाला पण दांडपट्टा खेळत असता लोखंडेंची प्राणज्योत मालवली, मैत्रीत खंड पडला. शेवटच्या घटका मोजत त्यांनी शिंदेकडून वचन घेतलं, "जोवर आकाशात चंद्र- सूर्य आहेत तोवर आपल्या प्रतीक म्हणून शिंदे- लोखंडे अशा दोन्ही कावडी एकत्र शिखरशिंगणापूरला जातील. त्यात खंड पडणार नाही आणि तोवर मानाप्रमाणे दोन्हीं कावडींच्या पताकांची नक्कल कोणीही करू शकणार नाही."
"गेल्या कित्येक पिढ्यांपासून भाळवणीकर दोन मित्रांचं हे वचन प्राणपणानं जपतात. आजही जेव्हा कावडी शिखरशिंगणापूरला जातात भाळवणी निर्मनुष्य होते. परंपरा, एकी, वचनबद्ध , पिढ्या...त्यामिमित्ताने चार पिढ्या एकत्र आल्या. लेकरांना कोकरं - पिल्लं भेटली...श्री क्षेत्र तुळजापूर... आई ... कुलदेवता, सहकुटुंब दर्शन..."
प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. फोटोमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. तसेच ती भक्तीत तल्लीन झालेली पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच ती आपल्या लाडक्या दोन भाच्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तिने एक परफेक्ट फॅमिली फोटो देखील शेअर केला आहे. देवाचे दर्शन घेताना त्याची पूजा करताना प्राजक्ता दिसत आहे.