LSG beat MI: मुंबई इंडियन्सचा पराभव झाला अन् Rohit Sharma चा हसतानाचा 'तो' Video Viral, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय?
esakal April 05, 2025 10:45 AM

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स (MI) वर १२ धावांनी रोमांचक विजय मिळवला. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झाला आणि यजमानांनी २०३ धावांचा यशस्वी बचाव केला. LSG ने डेथ ओव्हर्समध्ये संयम राखत हंगामातील दुसरा विजय मिळवला आणि गुणतक्त्यात वर सरकले. या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही, परंतु तो डग आऊटमध्ये बसून खेळाडूंना काही सुचना करत होता. त्याचा डग आऊटमधील एक व्हिडीओ सध्या गाजतोय.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ला मिशेल मार्शने शानदार सुरुवात करून दिली. त्याने फक्त ३१ चेंडूत ६० धावा कुटल्या. एडन मार्करमने ३८ चेंडूत ५३ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली, तर डेव्हिड मिलरने १४ चेंडूत २७ धावांची झटपट खेळी करत संघाला २०३ धावांपर्यंत पोहोचवले. MI चा कर्णधार हार्दिक पंड्याच्या ५ बाद ३६ धावा या अप्रतिम गोलंदाजीमुळे लखनऊला आणखी जास्तीच्या धावा करण्यापासून रोखले.

प्रत्युत्तरात, MI ची सुरुवात खराब झाली कारण विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन स्वस्तात बाद झाले. नमन धीरने २४ चेंडूत ४६ धावांची तुफानी खेळी करत संघाला सावरले, तर सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी करत गती कायम ठेवली. एका टप्प्यावर MI ला शेवटच्या ४ षटकांत ५२ धावांची गरज होती आणि विकेट्सही शिल्लक होत्या, पण LSG च्या गोलंदाजांनी दबावाखाली आपल्या योजना परफेक्टली अंमलात आणल्या.

तिलक वर्मा २५ धावांवर रिटायर्ड आऊट होऊन माघारी परतला, तेव्हा मुंबईला विजयासाठी ७ चेंडूंत २४ धावा हव्या होत्या. हार्दिक व मिचेल सँटनर यांच्यावर भिस्त होती. हार्दिकने पहिल्या दोन चेंडूवर ८ धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर धाव न घेता तो स्वतः स्ट्राईकवर राहिला, परंतु पुढील तीन चेंडूवर त्याला विजय खेचून आणता आला नाही. आवेश खानने उत्तम गोलंदाजी केली. मुंबईला ५ बाद १९१ धावांवर त्याने रोखले.

या सामन्यात लखनऊचे क्षेत्ररक्षण हा चर्चेचा विषय राहिला. त्यांची फिल्डिंग पाहून रोहितला हसू आवरले नाही. रवी बिश्नोई त्याच्याच गोलंदाजीवर मुंबईच्या फलंदाजाला रन आऊट करायला गेला आणि त्याने फेकलेला चेंडू रिषभच्या पायावर आदळला. हे पासून रोहित शर्मा जोरजोरात हसला. त्याला हसताना पाहून स्टेडियमही दणाणून गेले आणि १३१ डेसिबल इतका आवाज झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.