पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींचा खास सन्मान करण्यात आला आहे. मोदींना श्रीलंकन सरकारने मित्र विभूषण पुरस्कार देऊन गौरवलं आहे. एखाद्या विदेशी देशाकडून मोदींना देण्यात आलेला हा 22 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करने आमि दोन देशातील संस्कृती आणि वारसाला बळकटी देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मित्र विभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीलंकेकडून मित्र विभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणं माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. भारत-श्रीलंकेतील घनिष्ट नातच या पदकातून दिसून येतंय. हा केवळ माझ्या एकट्याचा सन्मान नाहीये. तर 140 कोटी भारतीय जनतेचा हा सन्मान आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील घनिष्ट संबंधाचाही सन्मान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या मेडलला धर्मचक्राची उपमा देण्यात आली आहे. हे पदक बौद्ध परंपरेच्या वारश्याचं प्रतिनिधीत्व करतं. दोन्ही देशाच्या सांस्कृतिक परंपरेला त्याने आकार दिलेला आहे. यात नऊ किमती रत्न लावम्यता आलेली आहे. तसेच पदकाच्या मध्यभागी कमळाच्या पाकळ्या दाखवण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांना मिळालेला हा सन्मान श्रीलंका आणि इतर देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. तसेच, हा सन्मान भारत आणि श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि सखोल मैत्रीचे प्रतीक आहे.
आज राष्ट्रपती अनुरा दिसानायके यांच्या हस्ते मला पुरस्कार देण्यात आला. ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. दोन्ही देशातील मैत्री किती घनिष्ट आहे, हेच यातून दिसतं. भारत आणि श्रीलंकेचे ऐतिहासिक संबंध आहेत. यात मैत्रीचा धागा समान आहे. एक सच्चा शेजारी देश म्हणून आम्ही आतापर्यंत काम करत आलो ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग 2019मधील दहशतवादी हल्ला असो, कोव्हिड महामारी असो, नुकतंच आलेलं आर्थिक संकट असो… श्रीलंकेच्या प्रत्येक कठिण काळात भारत त्यांच्या मदतीला धावून गेला आहे, असं मोदी म्हणाले.
श्रीलंका हा केवळ शेजारील देश नसून आपला पारंपरिक मित्र आहे. भारत आणि श्रीलंकेचे सुरक्षा हितसंबंध समान आहेत. आम्ही सहकार्य करणाऱ्या देशांना प्राधान्य देतो. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. दोन्ही देशांची सुरक्षा एकमेकांवर अवलंबून आहे. श्रीलंका पुन्हा प्रगतीच्या मार्गावर आहे. श्रीलंकेच्या नागरिकांच्या संयम आणि धैर्याला सलाम. भारत श्रीलंकेला आर्थिक मदत करत राहील, असं मोदी म्हणाले.