Amit Parab : मराठी अभिनेता अमित परबने 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं, त्याने अभिनय क्षेत्रातून थोडा ब्रेक घेत कोकणातील अस्सल फळांचे ज्यूस शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'मालवण स्टाईल' या ब्रँडची स्थापना केली आहे. या उपक्रमाद्वारे तो गावातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत आणि शहरातील लोकांना कोकणातील अस्सल चवीचा आनंद देत आहेत.
अमित परबने एमबीए केल्यानंतर सात वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले, परंतु अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने '' या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतरही त्याची आपल्या मातीशी जोडलेले राहण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने कोकणातील अस्सल फळांचे ज्यूस शहरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.
'मालवण स्टाईल' या ब्रँडच्या माध्यमातून अमित परब याने साखर विरहित ज्यूसची निर्मिती सुरू केली आहे, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनाही कोकणातील फळांचे अस्सल रस चाखता येतील. त्यांनी कोकणात जाऊन उत्पादन संशोधन केले आणि 'मालवण स्टाईल'ची वेबसाइट तयार केली, त्यामुळे ग्राहक थेट खरेदी करू शकतात.
चा उद्देश कोकणातील स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा आहे. आगामी काळात ते कोकणात बनवलेले आणखी खाद्यपदार्थ ग्राहकांच्या दारात पोहोचवण्याचा मानस बाळगतात.