चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवूनही दिल्ली कर्णधार अक्षर पटेल नाखूश, म्हणाला…
GH News April 06, 2025 12:07 AM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 17 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 25 धावांनी जिंकला. तसेच या सामन्यात विजयाचा मानकरी ठरला तो केएल राहुल.. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 6 गडी गमवून 183 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करणं काही चेन्नई सुपर किंग्सला जमलं नाही. 20 षटकात फक्त 5 गडी गमवून 158 धावांपर्यंत मजल मारता आली. विजयासाठीच्या 25 धावा तोकड्या पडल्या. शेवटच्या काही षटकात धावांचं अंतर खूप असताना महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र त्यालाही काही खास करता आलं नाही. या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्यानंतर चित्र बदलू शकतं. पण तुर्तास तरी दिल्ली कॅपिटल्सन 6 गुण आणि +1.257 नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल काही खूश नाही.

अक्षर पटेलने सांगितलं की, ‘मला अपेक्षा नव्हती की हे सलग तीन सामने जिंकणं होईल. पण सर्वांनी योगदान दिले, संघाचे संतुलन चांगले दिसते. कर्णधार म्हणून तीन पैकी तीन जिंकणे नक्कीच चांगलं वाटेल. टीम मीटिंगमधील गप्पा प्रभाव पाडण्याबद्दल आहेत जे खूप महत्वाचे आहे. मी आज जास्त गोलंदाजी करण्याचा भानगडीत पडलो नाही. माझ्या बोटाला दुखापत देखील आहे. मला गोलंदाजी करायची होती पण धोका पत्करायचा नव्हता. कारण ही एक लांब स्पर्धा आहे. वाहून न जाणे महत्वाचे आहे. प्रत्येक सामन्यात काही चांगले झेल आणि काही ड्रॉप देखील असतात. कर्णधार म्हणून, मला वाटत नाही की आम्ही अद्याप एक परिपूर्ण सामना खेळलो आहोत. आम्ही चांगली सुरुवात केली आहे परंतु आयपीएल ही एक लांब स्पर्धा आहे, चित्र कधीही बदलू शकते.’

दोन्ही संघाची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.