यशोगाथा: अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या शेतकऱ्याने मसाला शेतीतून क्रांती केली आहे. विदर्भातील कोरडवाहू पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी मुझफ्फर हुसैन यांनी मसाला शेतीमधून प्रगती साधली आहे. कमी पाणी, कमी खर्च आणि अधिक नफा या तत्त्वावर आधारित केलेली मसाला शेती आज त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक रो़ मॉडेल तयार केलं आहे.
मुझफ्फर हुसैन यांनी पारंपारिक पिकांची शेती करण्यापेक्षा अधिक फायदेशीर आणि शाश्वत मूल्यवर्धित मसाला शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मुझफ्फर हुसैन यांनी काळी मिरी, हळद, काळे आलं, काजू, तमालपत्र, कोकम, जायफळ, दालचिनी, इलायची यांसारख्या महागड्या पिकांची लागवड केली आहे. त्यातून ते चांगला नफा मिळवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या सहाय्याने त्यांनी मसाला शेतीचा एक यशस्वी प्रयोग राबवला आहे. ते आज विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अन्नधान्ये पीके : ज्वारी, मका, बाजरी, चारा, गहू, भाजीपाला मसाल्याचे व फळझाडे : आलं, हळद, वेलदोडा (वार्षिक पीक), काजू, दालचिनी, कोकम, काळी मिरी, चिंच, ऊस, आंबा, सिताफळ, संत्रा, मोसंबी. ५ वर्षांनंतर वार्षिक उत्पन्न देणारी पिके : जॅकफ्रूट (फणस). ३ वर्षांनी वार्षिक उत्पादन देणारी पिके : काजू, बांबू. लाकूड देणारी झाडे – सिल्व्हर ओक, महोगनी, जॅकफ्रूट
आंबा, सिताफळ, संत्रा आणि मोसंबी हे थेट मार्केटमध्ये विक्री केले जाते. काजू मल्टिप्लिकेशन, केसर मल्टिप्लिकेशन, काळी मिरी रोपांचे उत्पादन यांच्या शेतावर केले जाते. यासोबतच 3 प्रकारच्या हळदीची देखील पावडर आणि काळ्या आल्याची पावडर बनवून त्याचे पॅकेजिंग व कॅप्सूल उत्पादन केले जातचे. शेतमाल, प्रकिया केलेले पदार्थ विक्री करून ते वर्षाकाठी लाखोंची कमाई करतात.
मसाला शेतीमुळं पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा
शेतकऱ्याने दिलेल्या माहितीमुळं मसाला शेतीमुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा मिळत आहे. अनेक शेतकरी या दिशेने वाटचाल करत आहेत. मसाला शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुझफ्फर हुसैन हे मार्गदर्शनही करतात. यात जैविक खतांचा वापर, योग्य पीक निवड, कीड नियंत्रण, मल्चिंग, जलसंधारण आणि विपणन यासंबंधी मार्गदर्शन दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून अनेक शेतकरी मसाला शेतीकडे वळताना दिसत आहेत.
अधिक पाहा..