Akshay Kelkar : 'बिग बॉस' विजेत्याच्या घरी लगीनघाई; नुकतेच पार पडले केळवण, पाहा PHOTOS
Saam TV April 06, 2025 04:45 PM

नवीन वर्षात मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली तर काहींनी लग्नगाठ बांधली आहे. अशात आता 'बिग बॉस मराठी 4' चा विजेता प्रसिध्द अभिनेता अक्षय केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याचे पहिले केळवण पार पडले आहे. अलिकडेच अक्षय केळकरने (Akshay Kelkar) आपल्या नात्याची कबुली देऊन त्यांच्या गर्लफ्रेंडची ओळख चाहत्यांना करून दिली होती.

akshay kelkar

केळकरच्या आयुष्यातील 'रमा' म्हणजे त्याची मैत्रीण साधना काकतकर आहे. सध्या अक्षयच्या घरात लगीनघाई पाहायला मिळत आहे. अक्षय केळकर मे महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. अक्षय केळकरच्या जवळच्या मैत्रिणीने नुकतेच त्यांचे केळवण खास पद्धतीत पार पाडले आहे. अक्षयची ही खास मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री केळकर (Samruddhi Kelkar) आहे.

अक्षय आणि साधनासाठी समृद्धी केळकरने खूप खास बेत आखला होता. यात आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी पाहायला मिळत आहे. फुलांनी तिने घरी सजावट केली आहे. तर केळीच्या पानावर 'अक्षय-साधनाचं ' असे लिहिलं आहे. तिने अक्षयच्या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

akshay kelkar

अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर हे छान मित्र आहेत. त्यांनी अनेक कामे एकत्र केली आहेत. त्यांची 'दोन कटींग' ही सीरिज चाहत्यांना तर खूप आवडली. याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. तर अक्षय केळकरल खरी ओळख 'बिग बॉस मराठी 4' मधून मिळाली. घरातील त्याचा वावर, त्याची खेळ खेळण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडली. त्याने अनेक हिट मालिका केल्या आहेत. लवकरच तो 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.