आयपीएलच्या इतिहासातील पहिली सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स 18 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबईचा हा या मोसमातील पाचवा तर वानखेडे स्टेडियममधील दुसरा सामना असणार आहे. तर आरसीबीचा चौथा सामना असणार आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईचा कोणत्याही परिस्थिती 2 पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल होणार असल्याचं निश्चित आहे. पलटणच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाचा समावेश होणार आणि कुणाचा पत्ता कट होऊ शकतो? हे जाणून घेऊयात.
मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोघांचा समावेश होणार आहे. रोहित शर्माला दुखापतीमुळे लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. रोहितला सरावादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित लखनौविरुद्ध खेळू शकला नव्हता. त्यामुळे वल जॅक्स याचा समावेश करण्यात आला होता. तसेच आरसीबीविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित फिट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रोहितच्या एन्ट्रीनंतर विल जॅक्स याला पुन्हा बेंचवर बसावं लागणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईच्या गोटात अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह परतला आहे. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटरपासून 3 महिने दूर रहावं लागलं होतं. मात्र आता बुमराह कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुमराह आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचं हेड कोच महेला जयवर्धने याने सांगितलं आहे. त्यामुळे बुमराहचं कमबॅक निश्चित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे जसप्रीतच्या कमबॅकनंतर अश्वनी कुमार याला बाहेर केलं जाऊ शकतं.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.