गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 19 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला घरच्या मैदानात 7 विकेट्सने लोळवलं. गुजरातने विजयासाठी मिळालेलं 153 धावांचं आव्हान हे 16.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. कर्णधार शुबमन गिल, डेब्यूटंट वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रुदरफोर्ड या तिघांनी धावा केल्या आणि गुजरातला एकतर्फी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शुबमनने सर्वाधिक आणि नाबाद 61 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 49 धावांची तोडू खेळी केली. तर शेरफेन रुदरफोर्डने 16 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली. गुजरातने यासह सलग तिसरा विजय मिळवला. तर त्याआधी गुजरातचा गोलंदाज मोहम्मद सिराजने 4 विकेट्स घेतल्या. सिराजला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. यासह नवजोत सिंह सिद्धू यांची भविष्यवाणी खरी ठरली. सिद्धू यांनी नक्की काय भविष्यवाणी केली होती? हे जाणून घेऊयात.
सिराजने हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या घातक फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि डोकेदुखी दूर केली. तसेच त्यानतंर सिराजने अनिकेत वर्मा आणि सिमरजीत सिंह या दोघांनाही बाद केलं. सिराजने 4 ओव्हरमध्ये 17 धावांच्या मोबदल्यात 4.20 च्या इकॉनॉमी रेटने या 4 विकेट्स घेतल्या. सिद्धू यांनी ही कामगिरी पाहून सिराजच मॅन ऑफ द मॅच ठरेल, असं म्हटलं. जे सामन्यानंतर खरं ठरलं.
दरम्यान सिराज ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. सिराजने याआधी 2 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या. सिराजने 19 धावांच्या मोबदल्यात ही कामगिरी केली होती. त्यासाठी सिराजला या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
मियाँ मॅजिक ‘मॅन ऑफ द मॅच’
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडीस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.