ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा शेतकऱ्यांना फटका बसू नये, सरकारनं तातडीनं पावले उचलावीत : तुपकर
Marathi April 07, 2025 09:25 PM

रवीकांत तुपकर: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टॅरिफ बॉम्ब टाकल्याने देशात आर्थिक मंदी (economic recession) येण्याची शक्यात तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळं देश कोलमडला जाईल, म्हणून सरकारने तातडीने ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत असे मत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी व्यक्त केले. या बॉम्बचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर राहणार आहे. त्यामुळं शेती उपयोगी अवजारे, कीटक नाशके, खते बी-बियाणे यांचे भाव वाढतील. हे होऊ नये, यासाठी सरकारनं तातडीने ठोस पावले उचलावी जेणेकरुन सर्व सामान्यांना दिलासा मिळेल असे रविकांत तुपकर म्हणाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत द्यावी

आता झालेल्या अवकाळी पावसाचा फटका असंख्य शेतकऱ्यांना बसल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. सर्व पिके उध्वस्त झाली आहेत. अद्यापपर्यंत पंचनामे झालेली नाहीत. आर्थिक मदत झाली नाही. सरकारने तातडीने याचे पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी. तसेच मदत यावर्षीच द्यावी दोन वर्षांनी देऊ नये असेही तुपकर म्हणाले.

प्रत्येक मंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे

सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे. सर्व सामान्यांना दिलास देणारी वक्तव्य केली पाहिजेत. जनतेच्या मनात आम्ही तुमच्या पाठीशी आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे असं बोललं पाहिजडे असे तुपकर म्हणाले. जनतेच्या मनात चिड निर्माण होणार नाही असं मंत्र्यांनी वागलं पाहिजे. नाहीतर मंत्रिपदावर राहून काय फायदा? असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला. अमेरिकामध्ये जनता रस्त्यावर उतरली तसं आपल्याकडेही जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी तुपकरांनी दिला.

अमेरिकन वस्तुंची आयात करताना जगातील अनेक देशात मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. त्याला प्रत्युत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी 180 पेक्षा अधिक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ (Deducted Reciprocal Tariff) लावला आहे. म्हणजे अमेरिकेत आयात होणाऱ्या सामानावर हा रेसिप्रोकल टॅरिफ लागणार आहे. या निर्णयामुळे जगात हाहाकार उडाला आहे. आशियाई बाजार असो, वा चिनी किंवा ऑस्ट्रेलियन बाजार. सर्वत्र घसरण पहायला मिळतेय.

https://www.youtube.com/watch?v=SN8H5JOZPEG

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.