चांदीची किंमत: चांदीच्या दरात (Silver Price) सातत्यानं बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या 48 तासात चांदीच्या भावात प्रतिकिलो 15 हजार रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 1 लाख 04 हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी आज 91 हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. त्यामुळं चांगी खरेदीदारांना मोठी संधी निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी 1 लाख 4 हजार रुपयांच्या वर असलेले चांदीचे भाव आज 91 हजार रुपयांवर आले आहेत. गेल्या 48 तासात चांदीच्या भावात प्रति किलो 15000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं खामगाव येथील देशभरात प्रसिद्ध असलेल्या चांदीच्या बाजारपेठेत चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या टेरिफ धोरणाचा परिणाम म्हणून चांदीच्या भावात जवळपास 48 तासात 15 हजार रुपये प्रति किलो कमी आली आहे. आगामी काळात हे भाव अजून कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोने आणि चांदी यावर टॅरिफ लादलेलं नाही. यामुळं पुरवठ्याच्या बाजूनं चिंता कमी झाली आहे. कॉमेक्सवरील दबाव यामुळं वाढू लागला आहे. यामुळं देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरावर दबाव वाढून त्यात घसरण होण्याची शक्यता वर्तवली होती. 10 ग्रॅम सोन्याचे 88800 रुपयांवर टिकून राहणं अवघड दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यास ते 87000 रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. सोने दरातील घसरणीचा ट्रेंड कायम राहिल्यास 10 ग्रॅमचा दर 84000 रुपयांपर्यंत घसरु शकतो.अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं यावर्षी व्याज दरात लवकर कपात केली जाणार नाही हे जाहीर केलं आहे. त्यामुळं सोन्याच्या दरावर दबाव कायम राहू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष स्वीकारल्यानंतर टॅरिफ लादण्याचे संकेत दिले होते. 31 डिसेंबरला सोन्याचे दर 79000 हजारांच्या दरम्यान होते. ते सोन्याचे दर जीएसटी आणि इतर करांसह 94000 पर्यंत पोहोचले होते. आता त्यामध्ये थोडी घसरण सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोन्या चांदीचे दर कमी झाल्याल खरेदीदारांना मोठी संधी निर्माण होणार आहे. कारण सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं.
https://www.youtube.com/watch?v=5nzz7wucjti
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..