MI vs RCB Live: ४,४,६,४,६,६,४...! विराटच्या विकेटनंतर कॅप्टन Rajat Patidar पेटला; मुंबईचा डाव मनगटाच्या जोरावर ठेचला
esakal April 08, 2025 05:45 AM

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Marathi Update: विराट कोहलीच्या दमदार ६७ धावांच्या खेळीनंतर कर्णधार रजत पाटीदारने ( Rajat Patidar) मैदान गाजवले. हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ड, दीपक चहर यांच्यावर कोणतीही दयामाया त्याने दाखवली नाही. रजतच्या आतषबाजीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोनशेपार पोहोचवले. त्याने ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांची भागीदारी केली.

ट्रेंट बोल्टने मुंबईला पहिला षटकात फिल सॉल्टची विकेट मिळवून दिली, परंतु अन्य गोलंदाजांना आलेल्या अपयशाने बंगळुरूने मुसंडी मारली. विराट कोहली व देवदत्त पडिक्कल आडव्या पट्ट्यात मुंबईच्या गोलंदाजांना चोपत होते. विराटने तर जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडूं दिवेचा पॅव्हेलियनच्या दिशेने भिरकावला. विराट व पडिक्कल यांची फटकेबाजी मुंबईच्या चाहत्यांची चिंता वाढवत होती, तेच बंगळुरूच्या चाहत्यांना जल्लोषाची संधी देत होती.

या दोघांनी ५२ चेंडूंत ९१ धावंची भागीदारी करताना संघाला ९ षटकांत दहाच्या सरासरीने धावा चोपून दिल्या. पडिक्कल २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावांवर विग्नेश पुथूरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विराटने आजच्या सामन्यात ट्वेंटी-२०त क्रिकेटमधील १३००० धावांचा टप्पा ओलांडला. इतक्या धावा करणारा तो जगातील पाचवा आणि पहिला भारतीय ठरला. पडिक्कलच्या विकेटनंतर विराटने सर्व भार खांद्यावर घेतला आणि सुरेख फटक्यांची आतषबाजी केली.

उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट १५ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने मोर्चा सांभाळला, परंतु लिएम लिव्हिंगस्टोनने (०) पुन्हा निराश केले. पांड्याने १५ व्या षटकात RCB ला दोन मोठे धक्के दिले. मात्र, पाटीदार उभा राहिला आणि २५ चेंडूंत अऱ्धशतक पूर्ण केले. त्याने त्याच्या मनगटाचा जोर दाखवताना मैदानाच्या सर्वबाजूंना चेंडू सहजतेने टोलवला.

दरम्यान, हार्दिक पांड्याने ट्वेंटी-२०त ५००० धावा आणि २०० विकेट्स असा दुहेरी पराक्रम आज पूर्ण केला. किरॉन पोलार्ड, रवी बोपारा, आंद्रे रसेल, शेन वॉटसन, मोहम्मद हाफिज, शाकिब अल हसन, मोईन अली, ड्वे्न ब्राव्हो, समित पटेल, मोहम्मद नबी, डॅनिएल ख्रिस्टीयन यांच्या पंक्तित हार्दिक बसला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.