Maharashtra Politics Live : शीतपेयाच्या बाटलीवरून वाद; माजी सैनिकानं रागाच्या भरात झाडल्या दोन गोळ्या
Sarkarnama April 10, 2025 02:45 AM
Buldhana Update : शीतपेयाच्या बाटलीवरून वाद; माजी सैनिकानं रागाच्या भरात झाडल्या दोन गोळ्या

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेलापूर इथं माजी सैनिकाने क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात बंदुकीतून थेट दोन गोळ्या झाडल्या. या घटनेने खळबळ उडाली आहे. गणेश नामदेव चिम (वय 50) असे गोळीबार करणाऱ्या माजी सैनिकाचे नाव आहे. शीतपेयाच्या बॉटलवरून झालेल्या वादातून त्याने आपल्या परवाना धारक बंदुकीतून गोळीबार केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोराखेडी पोलिसांनी गणेश चिम याला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Cabinet meeting : सरकारी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी महाविद्यालयांतील अध्यापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील सरकारी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्राध्यापक- 1 लाख 50 हजार रुपये, सहयोगी प्राध्यापक 1 लाख 20 हजार रुपये, सहाय्यक प्राध्यापक – 1 लाख रुपये मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली.

Shaktipeeth Highway Project : कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न; माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप

महायुती सरकारचा महत्त्वाकांची प्रकल्प असलेला शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी यवतमाळच्या महागांव तालुक्यातील हिवरासंगम येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. राज्याच्या बारा जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून 27 हजार एकर जमीन शेतकऱ्यांची हडपण्याचा हा प्रकार आहे. यातून 50 हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकण्याचे काम हे महायुती सरकार करणार असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

Prashant Koratkar News : कोरटकर पाठीशी कोण घालतंय याची उत्तर मिळायला हवीत : इंद्रजीत सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांसह छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन देत न्यायालयाने दिलासा दिला. यानंतर आता इंद्रजीत सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, युगपुरूषाबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना जास्तीजास्त शिक्षा करण्यासाठी राज्यकर्त्यांना विनंती आहे. यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलावीत. तर कोरटकर फोन करण्यासाठी माझा नंबर कोणी दिला? त्याला पाठीशी कोण घालतंय? त्याच्या सोबत कोण होते? याचीही उत्तर माझ्यासह जनतेला मिळायला हवीत.

Prashant Koratkar News : जामीन देताना कोरटकरला न्यायालयाने घातल्या या अटी व शर्ती

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यासह इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण त्याला आणखीन दोन दिवस कोठडीत राहावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याला न्यायालयाकडून कोणत्या अटी आणि शर्ती घातल्या याची चर्चा न्यायालय परिसरात सुरू झाली आहे. कोरडकर जामीन देताना न्यायालयाने पन्नास हजार रुपयांचा जात मुचलका, तपासासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर राहणे आणि फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवू नये अशा अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.

BJP Pune Meeting : मेधा कुलकर्णींना दणका? चंद्रकांतदादा-मोहोळांकडून 'त्या' आंदोलनाचं समर्थन

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिला तनिषा भिसे हिचा मृत्यू झाला होता. यानंतर भाजपच्या महिला आघाडीने डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या क्लिनिकची तोडफोड केली होती. यावरून खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज याचे पडसाद भाजपच्या बैठकीत उमटले. चंद्रकांत पाटलांसह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्या महिला आघाडीच्या आंदोलनाची पाठराखण करत समर्थन केलं आहे.

Prashant Koratkar News : अखेर प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यासह इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झाला आहे. कोरटकर 5 दिवस पोलिस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. आज झालेल्या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीत त्याचा जामीन मंजूर झाला आहे.

nagpur violence News : फहीम खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी फहीमची पोलीस कोठडी घेतली असून आता फहीमच्या जामीन अर्जावर 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

Shaktipeeth Expressway News : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्टला बीड विरोध

राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण आता या महामार्गाला मोठा विरोध होत असून बीड जिल्ह्यात देखील विरोध सुरू झाला आहे. या महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Walmik Karad News : कोर्टात कागदपत्रे सादर

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. त्याआधी सीआयडीकडून आरोपी वाल्मिक कराडविरोधात कोर्टात आणखी पुरावे सादर केले आहेत. हत्येशी संबंधित काही कागदपत्रे कोर्टात सादर करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे गुरूवारी कोर्टात होणाऱ्या सुनावणीवेळी हे पुरावे समोर आणले जातील.

Prashant Koratkar update : प्रशांत कोरटकरच्या जामीनावर सुनावणी

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीनावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी होणार आहे. कोरटकरला जामीन मिळणार की नाही, हे आज स्पष्ट होईल.

Maharashtra Assembly Election : सर्वात मोठा घोटाळा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाजून खर्गे यांनी यांनी केला आहे. गुजरातमध्ये आयोजित पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी हा आरोप केला आहे. महाराष्ट्रात निवडणुकीआधी २२ लाख मतदार कसे वाढले, असा प्रश्न खर्गेंनी यावेळी उपस्थित केला.

Maharashtra Breaking News: राजू शेट्टींचा अजितदादांना इशारा

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. सातबारा कोरा करण्याची क्षमता नव्हती तर आश्वासन का दिले, अजित पवार या आधीही अर्थमंत्री होते, त्यांना खडा न खडा माहिती होती तर का गंडवले, त्यांनी केलेली फसवणूक महागात पडेल, असे खडेबोल शेट्टी यांनी अजितदादांना सुनावले.

Jalna live: जालन्यात शेतकऱ्यांचे आंदोलनात टायर जाळले...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. आज संतप्त शेतकऱ्यांनी जालन्यातील चापडगाव येथे एसटी बससमोर टायर जाळून आंदोलन केले.

MNS LIVE Updates: गोदावरी स्वच्छतेसाठी मनसैनिक आक्रमक

Nashik News: गोदावरी स्वच्छतेसाठी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. गोदावरीतील प्रदूषण रोखण्यासाठी मनसे गोदापात्रात उतरले आहेत. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली.

Pune live: शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा झटका; 32 महिलांचा राजीनामा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा झटका बसला आहे. महिला पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे काम थांबवलं आहे. पक्षातील वरिष्ठ लक्ष देत नसल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील 32 महिला पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा दिला आहे. या सर्व महिला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

Pune live: श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्स्यासाठी आक्रमक

भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे या उपोषणास बसल्या आहेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. या अनास्थेला कंटाळून सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी येथे उपोषणास बसल्या आहेत.

Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर भारतीयांसाठी आता 'मराठी की पाठशाला'

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी 'मराठी की पाठशाला' उपक्रम राबवला जाणार आहे. ठाकरे गटाचे उत्तर भारतीय प्रवक्ते आनंद दुबे यांची ही संकल्पना आहे. 13 एप्रिल ला दुपारी चार ते सात कांदिवली येथे उत्तर भारतीयांसाठी मराठीची पाठशाला भरवली जाणार आहे.

Dr. Sushrut Ghaisas : इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या बचावासाठी मैदानात

पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी उपचार न केल्यामुळे एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला रुग्णालयाच कारणीभूत असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. तर तनिषा भिसेंच्या मृत्यूला जबाबदार डॉ. सुश्रुत घैसास यांच्या राजीनाम्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. अशातच आता इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या बचावासाठी मैदानात उतरल्याचं समोर आलं आहे.

Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी पंजाब पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा आरोपीला पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे. झिशान अख्तरच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. पंजाबमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

Pune News : वारजेत गॅस सिलिंडर स्फोट, दोन जणांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील वारजे येथे मध्यरात्री एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली आहे. मोहन चव्हाण आणि आतिश चव्हाण असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन

मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत असून माफी मागावी आणि मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी, अशी उत्तर भारतीय विकास सेनेकडून मागणी करण्यात आली आहे. तर भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचे की नाही याचा विचार आम्ही करू, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होत. याच मराठी अमराठीच्या वादाचा वाद सुरू असतानाच संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला आहे. याबाबत संदीप देशपांडे यांनी दादर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Deenanath Mangeshkar Hospital : रुग्णालय परिसरात कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाही

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भात पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे. रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.