महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतीविषयक करत असलेल्या विधानांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी टीका केली. मंत्र्यांच्या स्वभावावरती सरकार चालत नाही. सरकार घटनेप्रमाणे चालवावे लागते. प्रत्येक सरकार समोर प्रश्न असतात. मात्र हे प्रश्न जेव्हा पुढे येतात, तेव्हा जबाबदारीने त्यांना न्याय द्यावा लागतो. जर कृषिमंत्री अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील, तर शेतकऱ्यांनी कुठे जायचे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. कृषिमंत्री हे शेतकऱ्यांचे प्रमुख आहेत, जर तेच असं बोलायला लागले तर आश्चर्य आहे, असा टोला हर्षवर्धन पाटलांनी लगावला.
Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कोकणात फक्त कोंबडी, वडे आणि मासे खायला येतात; भाजप खासदार राणेंची टीकाउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणाला काय दिल? त्यांनी किती पैसे सिंधुदुर्गसाठी दिले याची आकडेवारी काढा. त्यांना कोकणात येण्याचा अधिकार काय? मी सगळ्या हाॅटेलवाल्यांना सांगून ठेवलं आहे, ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोंबडी, वडे आणि मासे बंद ठेवा, अशा प्रकारची टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
Nilesh Rane : आमदार राणेंची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनावर आगपाखडजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरूवातीलाच शिवसेनेचे आमदार नीलेश राणेंनी प्रशासनाला निधी खर्च का होत नाही, यावरून धारेवर धरलं. तसेच जिल्ह्यात परराज्यातून होणारा ड्रग्स, गाईचं मांस मोठ्या प्रमाणावर आणून विकलं जातं. तसेच गांजा विकसित केला जातो. अशा विविध मुद्यावर पोलिस प्रशासनाला धारेवर धरलं. पोलिस प्रशासनाला विशेष यंत्रणा उभारायची असल्यास त्यांना जिल्हा नियोजनमधून पाठबळ देऊ. मात्र असे अनधिकृत धंदे बंद करण्याच्या सूचना आमदार राणे यांनी केल्या.
Supriya Sule : देवगिरी किल्ल्याबाबत सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्र्यांना पत्रछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याला ८ एप्रिल रोजी भीषण आग लागली होती. संरक्षित राष्ट्रीय स्मारक असूनही आग आटोक्यात आणण्याच्या उपाय योजनांचा अभाव होता. ही दुर्घटना ही धोक्याची घंटा होता, त्यामुळे आगीबाबत उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
Ganesh Naik : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक घेणार दुसरा जनता दरबारभारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात जनता दरबार भरवला होता. त्याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली हेाती. आता नाईक म्हणून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात दुसरा जनता दरबार घेणार आहेत. ठाण्यात हा दुसरा जनता दरबार नाईक घेणार आहेत.
Solapur NCP SP : सोलापुरातील पवारांच्या राष्ट्रवादीत रंगले नाराजीनाट्यज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीव सोलापूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील आणि आणि शशिकांत शिंदे हेही उपस्थित होते. मेळावा सुरू असताना बसायला खुर्ची दिली नाही; म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख हे भरसभेतून निघून गेले
Laxman Hake : खासदाराने बेजबाबदारपणाची वक्त्यव्ये करू नयेत : लक्ष्मण हाकेस्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा ही थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. थोरले प्रतापसिंह महाराज यांचंच अनुकरण महात्मा फुले यांनी केलं, असं विधान उदयनराजे भोसले यांनी केले होते. त्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रत्युतर दिले आहे. महाराष्ट्रातील जनता आणि छत्रपती या शब्दाचं एक नातं आहे. कुठलाही अभ्यास न करता, इतिहासकारांचा सल्ला न घेता एका खासदाराने अशी बेजबाबदारपणाची वक्त्यव्ये करू नयेत, असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे.
Deenanath MangeshkarHospital Case : पुणे पालिकेचा अहवाल सादरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला चौकशी अहवाल दि.८ एप्रिल रोजी विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला असून विभागाने अहवाल मा.मुख्यमंत्री यांना सादर केला आहे.आज दि.११ एप्रिल रोजी पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आला आहे.या दोन्ही चौकशी अहवालावर राज्य शासन तातडीने कारवाई करावी, अशी राज्य महिला आयोगाची मागणी आहे.
Prashant koratkar News : कोरटकर सुटला, थेट विमानतळावरप्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्याने त्याची तुरुंगात सुटका झाली आहे. पोलिसांनी त्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर पोलिसांनी कोरटकरला थेट विमानतळावर नेले. तिथून तो मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर जामिनावर बाहेरप्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकर जामिनावर बाहेर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबाबत कोरटकरने वादग्रस्त विधान केले होते. सात दिवसाच्या कोठडीनंतर प्रशांत कोरटकर जामिनावर सुटला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत पोलीस बंदोबस्तात कोरटकरची सुटका करण्यात आली. कोरटकरच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर कळंबा कारागृहासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात त्याला जिल्ह्याच्या वेशीवर सोडण्यात आले. माध्यम प्रतिनिधींच्या गाड्या अडवून ठेवल्यामुळे पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली
Pune live : उदयनराजेंमुळे नवा वाद पेटण्याची शक्यताभाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आलेल्या उदयनराजेंनी केलेलं वक्तव्य वादात अडकलंय आहे. थोरले प्रतापसिंह महाराजांकडून महिलांची पहिली शाळा सुरु करण्यात आली असा दावा उदयनराजेंनी केला.
Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis railway : महाराष्ट्रात 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरीAshwini Vaishnaw Devendra Fadnavis railway : महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे या प्रकल्पांमुळे राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारेल आणि विशेषतः विदर्भाला मोठा फायदा होईल, असे सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रसाठी नव्या रेल्वे मार्गांची घोषणा केली. विदर्भाला याचा फायदा होणार आहे.
Prashant Koratkar: अत्यंत गोपनीय पद्धतीने कोरटकर हलविण्याच्या हालचाली सुरुकोल्हापूर मधील कळंबा कारागृह बाहेर पडल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण मिळणार आहे. पोलिस संरक्षणात कोरटकरला जिल्हाबाहेर सोडण्यात येणार आहे. याबाबत जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्या अर्जावर मंजूरी दिली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने कोरटकर हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. प्रशांत कोरटकरने न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली होती.
Ajit Pawar live :मंगेशकर कुटुंबावर बोलताना वडेट्टीवारांची जीभ घसरली...पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे घटना नुकतीच घडली. या विषयावर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. ते माध्यमांशी बोलत होते. "हे कसलं कुटुंब ही तर लुटारुंची टोळी," अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना सल्ला दिला. 'मंगेशकर कुटुंबाबद्दल असं वक्तव्य करु नये'असे अजितदादा म्हणाले. त्यानंतरही वडेट्टीवार हे आपल्या विधानावर ठाम आहेत
फुले चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, वंचितचे पुण्यात आंदोलन करणारमहात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. काही लोकांच्या म्हणण्यामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्याचा आरोप वंचितने केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश आंबेडकर फुलेवाड्या बाहेर करणार आंदोलन करणार आहे. प्रकाश आंबेडकर या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे.
शिवाजी महाराजांचे स्माकर राज्यपाल भवनात करा - उदयनराजे भोसलेराज्यपाल भवनात राज्यपालांना जागा लागतेच किती? राज्यपाल भवनातछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
Pratap sarnaik On Ajit Pawar आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही अधिकार मागतोय - प्रताप सरनाईकएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. यावरून एसटी महामंडळावर टीका करण्यात येत आहे. मात्र, अर्थखात्याने निधी दिला नसल्याचे एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. आमच्या खात्याकडे पाठवलेली फाईल अर्थखात्याने परत पाठवली. आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही अधिकार मागतोय, असे देखील सरनाईक म्हणाले.
शहाजीबापू पाटलांना वाऱ्यावर सोडणार नाही - एकनाथ शिंदेविधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितले की, शहाजीबापूसाठी मी एक शब्द बोलेत तो म्हणजे टायगर अभी जिंदा है.
शेजर बाजारात तेजीमागील काही दिवासांपासून शेअर बाजाराची पडझड सुरू होती. अमेरिकेने जाहीर केलेल्या टॅरिफ धोरणाचा शेअर बाजारावर परिणाम होत होता. मात्र, या टॅरिफ धोरणाला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आज शेअर बाजार सावरला असून सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, तर निफ्टी 22,500 च्या वर गेल्याचे पाहायला मिळाले.
Ajit Pawar : थोडा धीर धरा नाशिक, रायगडचा तिढा सुटेल - अजित पवारदेशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे रायगड दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिढी लवकरच सुटेल असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "काळजी करू नका, नाशिक, रायगडचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नसला तरी कामं सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून जिल्हा नियोजनचे बजेट दिलं आहे.दोन्ही ठिकाणी निधी वाढवण्यात आला आहे. थोडासा धीर धरा, सर्व तिढा सुटेल.
Ajit Pawar : तिसरा अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर शासन कारवाई करेल - अजित पवारदीनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भातील दुसरा चौकशी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याची माहिती आहे. याबाबतचा तिसरा अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर शासन योग्य ती कारवाई करेल, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. शिवाय उद्या अमित शहा येणार असल्यामुळे याबाबतची माहिती मी उद्या मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
Sudhir Mungantiwar : माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे : सुधीर मुनगंटीवारनाशिकमधल्या व्याख्यानमालेत, जो या कार्यक्रमाला येतो त्यांचं प्रमोशन होतो असं आयोजक म्हणाले. त्यावर माझं प्रमोशन होण्यासाठी माझं सरकार राहिले पहिजे. उद्या आणि परवा येणारे वक्ते यांची नावं पाहिली तर त्यांचे देखील प्रमोशन होणार का? उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत येणार आहेत. माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावे लागेल, अशी मिश्किल टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली आहे.
Tahawwur Rana : तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडीमुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. त्यानंतर दिल्लीच्या विशेष न्यायालयाने राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएनं राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर अखेर 18 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.