गुगलने शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; अँड्रॉइड, पिक्सेल आणि क्रोम टीममधील मोठी कपात
Marathi April 12, 2025 01:25 PM

Google लेफ कर्मचारी: गुगलने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यात अँड्रॉइड, पिक्सेल आणि क्रोम टीममधील मोठी कपात करत अनेकांना नारळ दिला आहे. फेब्रुवारीमध्ये गुगलने त्यांच्या क्लाउड डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतरही हे घडले आहे. गुगलने जरी म्हटले आहे की नोकरी कपातीचा परिणाम फक्त काही क्षेत्रावर झाला असला तरी गुगलने गुरुवारी अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल फोन आणि क्रोम ब्राउझरवर काम करणाऱ्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइस युनिटमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असल्याचे बोलले जात आहे.

द इन्फॉर्मेशनच्या एका वृत्तानुसार, टेक जायंटने जानेवारीमध्ये युनिटमधील कर्मचाऱ्यांना दिलेल्या ऑफरनंतर ही कपात केली आहे. मात्र या अहवालात असलेल्या माहितीची सत्यता नेमकी काय ही पडताळू घेणं गरजेचं आहे. “गेल्या वर्षी प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइसेस टीम एकत्र केल्यापासून, आम्ही अधिक गतिमान बनण्यावर आणि अधिक प्रभावीपणे काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये जानेवारीमध्ये आम्ही देऊ केलेल्या स्वैच्छिक एक्झिट प्रोग्राम व्यतिरिक्त काही नोकऱ्या कमी करणे समाविष्ट आहे,” असे या अहवालात गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

तर ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये गुगलने त्यांच्या क्लाउड डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतरही हे घडले आहे, जरी त्यांनी म्हटले आहे की नोकरी कपातीचा परिणाम फक्त काही संघांवर झाला आहे. अहवालानुसार, जानेवारी 2023 मध्ये गुगलने 12 हजार  नोकऱ्या कमी करण्याची योजना जाहीर केली होती. जी त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या 6% इतकी आहे.

कपात टीमचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो

बिझनेस इनसाइडरच्या मते, प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट आणखी एका टाळेबंदीच्या फेरीचा विचार करत आहे. परंतु यावेळी मध्यम व्यवस्थापकांवर लक्ष केंद्रित करत आहे.कारण प्रकल्पांमध्ये कोडर आणि नॉन-कोडर यांचे प्रमाण वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. मायक्रोसॉफ्ट नोकऱ्यांमध्ये कपात मे महिन्यापर्यंत होऊ शकते आणि किती नोकऱ्या जातील हे स्पष्ट नसले तरी, अहवालानुसार, ही कपात टीमचा एक महत्त्वाचा भाग असू शकते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन्ही टेक दिग्गज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात ही गुगलने त्यांच्या बिझनेस अॅप्स पॅकेजसाठी अमेरिकन फेडरल एजन्सींना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत आणि सरकारी सॉफ्टवेअर मार्केटवरील मायक्रोसॉफ्टची दीर्घकाळापासूनची पकड कमी केली आहे,

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.