पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून डॉ. सुश्रुत घैसास यांना नोटीस धाडण्यात आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने हा मृत्यू झाल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. त्यासाठी आता डॉ. घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागविण्यात आला आहे. त्यामुळे घैसास यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेने भाकरी फिरवली, सचिव सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्तीशिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.
Amit Shah Raigad visit : अमित शाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणारकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज किल्ले रायगडावर येणार आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील. शिवाय अमिक शहांचा दौरा असला तरी रायगड किल्ल्यावर जाणार रोप-वे शिवभक्तांसाठी सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घर्गे यांनी दिली आहे.