मंचर, ता. १२ : ‘‘श्रीराम प्रभू यांनी लंकेवर स्वारी करताना श्री हनुमान महाराजांनी केलेली कामगिरी कायमस्वरूपी स्मरणात राहणारी आहे. गुरू व शिष्य हे नाते कसे असावे, याचा आदर्श म्हणजेच हनुमान आहेत. संकटमोचक अशी त्यांची कीर्ती आहे,’’ असे ज्ञानेश महाराज फाळके यांनी सांगितले.
निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील हनुमान मंदिरात शनिवारी (ता.१२) हनुमान जयंतीनिमित्त ज्ञानेश महाराज फाळके यांचे कीर्तन झाले. पहाटे चार वाजता अभिषेक व त्यानंतर कीर्तन झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनाला साथ देणारे विनायक महाराज निघोट, गायनाचार्य आदिनाथ महाराज धनुरे, मृदुंगमणी विनोद महाराज कुदळे यांचा सन्मान सरपंच नवनाथ निघोट यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हनुमान चालिसा पठण करण्यात आले.