Maharashtra News Live Updates : मंत्र्यांच्या शहरात पाणी टंचाई
Saam TV April 15, 2025 08:45 PM
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

- नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला होणार सुरुवात

- मात्र नाफेडच्या कांदा खरेदीत यंदा मोठा बदल

- मागील वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर नाफेडचा महत्वाचा निर्णय

- यंदा नाफेडने कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलं

- आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत करणार कांदा खरेदी

- कांदा खरेदीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नाफेडचा प्रयत्न

- सध्या कांद्याचे दर घसरत असल्यानं नाफेडच्या कांदा खरेदीने कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता

Maharashtra News Live Updates : मंत्र्यांच्या शहरात पाणी टंचाई

राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या राळेगावात तब्बल दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहेत.सध्या कडक ऊन्हाळा सुरू आहेत.अशात दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागतेय.या गंभीर विषयाकडे आदिवासी विकास मंत्री लक्ष देण्याची मागणी होत आहेत.

चार दिवसापासून कृषी पंपाची विज बंद असल्यानं शेतकऱ्याची उन्हाळी पिकं सुकन्याच्या मार्गावर...

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील येवती परिसरात मागील चार दिवसापासून कृषी पंपाची विज बंद असल्यानं शेतकऱ्याची उन्हाळी पिकं सुकन्याच्या मार्गावर आहेत. या परिसरात पैनगंगा नदीवर बॅरेज बांधण्यात आल्यानं मोठया प्रमाणात उन्हाळी मूग, भुईमूग, तीळ या सारखी पिकं घेतली जातात, उन्हाळी मूग सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र विज नसल्यानं शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळं ही पिकं सुकन्याच्या मार्गावर असून लवकर विज पुरवठा दुरुस्त करुन सुरळीत सुरु नं केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

देगलूरमध्ये तालावर काढून मारण्याची धमकी

नांदेडच्या देगलूर शहरात दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडलीय.युनूस गफूर शेख यांच्या मदनूर रोडवरील रिपेरिंग सेंटर समोर हायवा गाडी लावलेली काढण्यास सांगितल्याने हायवा चालकाच्या मित्राने युनूस व त्याच्या भावावर तलवार हातात घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.पोलिसात दिलेल्या तक्रारीवर सुधाकर कावटवार वर गुन्हा दाखल करण्यात आलाय,मात्र तलवार पाहून परिसरात काही काळ दशदीचे वातावरण निर्माण झाले होते.

संग्रामपूर तालुक्यातील ४४९ जन्म,मृत्यू आदेश रद्द ..

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील भारत शासन राजपत्राद्वारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा 1969 मध्ये सुधारणा करुन उशिरा जन्म मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केलेले होते, यांना प्रदान करण्यात आलेल्या कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.... शासन निर्णयानुसार तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिका-यांनी जन्म-मृत्यु प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत ते सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहे.... असे संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म,मृत्यू आदेश रद्द करण्यात आले असून कोणते शासकीय योजनेसाठी, लाभासाठी किंवा कायदेशीर कामासाठी ,अथवा नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही असे संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी माहिती दिली आहे.

JUNNAR-आवकाळी पाऊस, गारपिठीच्या शेताच्या बांधावरुन आढावा

कर्ज काढून, शेतीच्या मातीला सोनं करणं शक्य होईल या आशेने रात्रंदिवस राबलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक उभं केलं होतं. पण आभाळातून आलेल्या गारांनी ही मेहनत काही क्षणांत मातीमोल करून टाकली.टोमॅटो पाण्यात गेला, कष्टाची माती झालीय याआधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आता आणखी खोल खाईत ढकलले गेले आहेत. "आता नुकसानभरपाई नको, आमचं कर्ज तरी माफ करा!" असा आक्रोश शेतकऱ्यांकडून होतोय कारण नुकसान एवढं प्रचंड आहे की फक्त काही हजारांची भरपाई शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबवू शकत नाही. टोमॅटोने उभारी मिळेल, सणवार साजरे होतील, मुलांचं शिक्षण सुरू राहील, अशी स्वप्नं गारपिटीच्या थेंबांमध्ये विरघळून गेली.

हळदी मध्ये फुकट्या पाहूण्याने जेवणावर ताव मारत दागिने केले लंपास

वाशी गाव येथे एका हळदी समारंभात आलेल्या फुकट्या पाहूण्याने जेवणावर ताव मारत हळदी समारंभाला उपस्थित इसमाच्या दागिन्यांवरच आपले हात साफ केलेत. परेश पवार हे वाशी गावं येथे एका हळदी समारंभाला उपस्थित होते. यावेळी जेवणाच्या टेबलवर गाडीची चावी विसरल्याने ही चावी घेऊन चोरट्याने परेश यांच्या फॉर्चूनरचा दरवाजा उघडून त्यामध्ये ठेवलेले सुमारे 14 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 मोबाईल फोन चोरी केले. घटना लक्षात येताच परेश यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलीसांनी देखील तात्काळ तपासाला सुरुवात करत गाडी समोरील सिसीटीव्ही द्वारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी अंकुश सलगर हा स्थानिक टॅक्सी चालक असून फुकट जेवण करण्यासाठी आला असताना त्याने हे कृत्य केलेय. वाशी पोलीसांनी आरोपी अंकुश सलगर विरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व दागिने आणि मोबाईल हस्तगत केलेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.